|Thursday, May 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » विदेशी सैन्य दलाच्या पथकांचे गोव्यात आगमन

विदेशी सैन्य दलाच्या पथकांचे गोव्यात आगमन 

प्रतिनिधी/ वास्को

भारताशी मित्रत्वाचे संबंध असलेल्या 34 देशातील सैन्य दलाची पथके भारत दौऱयावर आलेली असून भारतीय नौदल, लष्कर व वायुदलाच्या अधिकाऱयांसह ही विदेशी सैन्य दलाची पथके काल गोवा नौदल क्षेत्राच्या भेटीसाठी दाखल झाली आहेत. उद्यापर्यंत या सैन्य दलांचे गोव्यात वास्तव्य असेल.

विदेशी सैन्य दलाच्या पथकांनी भारतीय सुरक्षा अधिकाऱयांसमवेत बुधवारी भारतीय नौदलाच्या आयएनएस गोमंतक येथील मुख्यालयात दाखल होऊन वरीष्ठ अधिकाऱयांची भेट घेतली व त्यांच्याशी चर्चा केली. विदेशी सैन्याला गोव्यातील आयएनएस हंस तळ, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हायड्रोलोजी तसेच संरक्षण उत्पादन उद्योग असलेल्या गोवा शिपयार्डचेही दर्शन घडवण्यात आले. शिपयार्डमधील जहाज बांधणी प्रकल्पाची त्यांनी पाहणी केली.

या विदेशी सैन्य दलाच्या पथकाने गोवा नौदल विभागाचे कार्यकारी ध्वजाधिकारी कोमोडर रघुनाथ के. नायर यांचीही भेट घेतली. आज गुरूवारी ‘डे एट सी’ असा समुद्री सफरीचा कार्यक्रम या पथकासाठी आयोजित करण्यात आला आहे. भारतीय नौदलाच्या पश्चिम आरमारातील आघाडीच्या युध्दनौकांवरून ते सफर करतील. तसेच भारतीय नौदलाच्या कवायती व सरावांचा ते प्रत्यक्ष अनुभव घेतील.

Related posts: