|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कुटबण जेटीवर आयकर छापे

कुटबण जेटीवर आयकर छापे 

रोख रक्कम 15 लाख जप्त. तीन कंपन्यांच्या कार्यालयांमध्ये सापडली रक्कम

प्रतिनिधी/ मडगाव

दक्षिण गोव्यातील कुटबण-बेतूल येथील जेटीवर काल बुधवारी दुपारी आयकर खात्याने मत्स्य व्यवहाराशी संबंधित असलेल्या तीन बढय़ा कंपन्यांच्या कार्यालयांवर छापे टाकले. या छाप्यांमध्ये सुमारे 15 लाख रोख रक्कम आयकर खात्याच्या हाती लागली आहे. या तिन्ही कंपन्या बिगर गोमंतकीय असून त्यांची कार्यालये कुटबण जेटीवर कार्यरत आहेत.

गोव्यातून मासळी खरेदी करून इतर राज्यात घेऊन जाण्याचा मोठा व्यवसाय कुटबण-बेतूल जेटीवरून चालतो. खास करून गोव्याच्या समुद्रात पकडण्यात येणाऱया कोळंबीला जास्त मागणी असते. परराज्यातील बढय़ा कंपन्या या व्यवसायात गुंतलेल्या आहेत. काल दुपारी 12 ते 12.30 वाजण्याच्या दरम्यान आयकर खात्याने या कंपन्यांच्या कार्यालयावर छापे मारले.

मत्स्य व्यवसाय कंपन्या रडावर

आयकर खात्याच्या सूत्रानी दिलेल्या माहितीनुसार पश्चिम बंगाल येथील बी. एम. फिशरीज या कंपनीच्या कार्यालयात सर्वाधिक रक्कम आढळून आली. इतर कंपन्याच्या कार्यालयात मात्र, विशेष काही हाती लागले नाही. आयकर खात्याने गोव्यात प्रथमच मासेमारी जेटीवर जाऊन कारवाई केल्याने, मत्स्य व्यवसायाशी संबंधीत असलेल्या कंपन्या आयकर खात्याच्या रडारवर असल्याचे स्पष्ट झाले.

कुटबण-बेतूल जेटीवरून दिवसाकाठी लाखो रूपयांचा व्यवसाय होत असतो. गोव्यातील मासळी थेट परराज्यात जात असल्याने स्थानिक बाजारपेठेत मासळीची कमतरता भासते. त्यानूनच गोव्यातील मासळी बाजारात मासळीचे भाव वाढत राहतात. तसेच ट्रॉलर मालक सरकारकडून अनुदान घेतात, मात्र मासळी गोव्याच्या बाजारात न विकता परस्पर इतर राज्यांमध्ये पाठवून दिली जात असल्याने या कारवाईचे दक्षिण गोव्यात स्वागतील जनतेकडून स्वागत झाले आहे.

‘प्राईड’ कॅसिनो, अधिकाऱयांची घरे, कार्यालयांवर छापे

आयकर खात्याच्या बेंगळूर येथील अधिकाऱयांनी ‘प्राईड’ कॅसिनोच्या अधिकाऱयाच्या घरावर तसेच कार्यालयावर आणि पर्वरी येथील एका हॉटेलवर छापा टाकून महत्त्वाचे दस्तावेज जप्त केले आहेत. खात्याची पाच पथके उत्तर गोव्यात बुधवारी कार्यरत होती. कॅसिनो जहाज, सांगोल्डा येथील अधिकाऱयांच्या घरावर, कार्यालयावर तसेच पर्वरी येथील हॉटेलवर छापे टाकण्यात आले असल्याची माहिती पाटो येथील आयकर खात्यातील सुत्रांनी दिली. छाप्यात कॅसिनोच्या रोजच्या उत्पन्नाचे महत्त्वाचे दस्तावेज जप्त करण्यात आले आहेत.

Related posts: