|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » leadingnews » जवान चंदू चव्हाणवर कोर्ट मार्शल नाही ; सूत्रांची माहिती

जवान चंदू चव्हाणवर कोर्ट मार्शल नाही ; सूत्रांची माहिती 

ऑनलाईन टीम / मुंबई :

नियंत्रण रेषा ओलांडून पुन्हा मायदेशात परत आलेला भारतीय लष्करातील जवान चंदू चव्हाणवर लष्कराकडून कोणत्याही प्रकारे कोर्ट मार्शलची कारवाई करण्यात येणार नसून, त्याच्यावर सौम्य कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून जवान चंदू चव्हाण पाकिस्तानात बंदिस्त होता. त्याच्या सुटकेसाठी संरक्षण मंत्रालयासह लष्करातील वरिष्ठ अधिकाऱयांनी प्रयत्न केले होते. त्यानंतर त्याची पाकिस्तानातून सुटका करण्यात आली. मात्र, त्याने सीमा रेषा ओलांडल्याच्या कारणामुळे लष्कराकडून त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार असून, या कारवाईदरम्यान त्याच्यावर कोर्ट मार्शल करण्यात येणार नाही. ही सौम्य कारवाई असेल. मात्र, या तीन महिन्यांच्या कालावधीतील सर्व भत्ते जवान चंदू चव्हाणला मिळणार आहेत.