|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » महापालिका हद्दीतील सायन-पनवेल महामार्गाच्या हस्तांतरणास मंजुरी

महापालिका हद्दीतील सायन-पनवेल महामार्गाच्या हस्तांतरणास मंजुरी 

नवी मुंबई / प्रतिनिधी

निधीअभावी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नवी मुंबई महापालिका हद्दीतून जाणाऱया सायन-पनवेल महामार्गाची योग्यप्रकारे देखभाल होत नसल्याने तो महापालिकेकडे हस्तांतर करवून घेण्यात यावा, या प्रस्तावाला बुधवारी महासभेने सर्वानुमते मंजुरी दिली.

सायन-पनवेल महामार्गाच्या देखभालीसंदर्भात चर्चा करताना मनोहर मढवी म्हणाले की, राज्य सरकार हा रस्ता बनविणाऱया कंपनीला 1 हजार 200 कोटी रुपये देणार आहे. त्यातील काही रक्कम पालिकेला मिळणार असून पाच वर्षांचे देखभाल दुरुस्ती त्याच कंत्राटदाराकडे आहे. तो ठेकेदार सरकारकडून पैसे घेत असल्याने त्याच्याकडूनच पाच वर्षे दुरुस्त करून घ्यावा. अडीच वर्षे कामे न झाल्याने तो निधी जमा झाल्याने पालिका तिजोरीत आता निधी दिसत आहे. त्यामुळेच आपण हा रस्ता आपल्याकडे घेत आहोत. महापालिका हद्दीतून 14 कि.मी. इतका सायन-पनवेल महामार्ग जात आहे. पावसाळ्यात या महामार्गावर मोठय़ा प्रमाणात खड्डे पडत असतात. यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने खड्डय़ांच्या जनहित याचिकेत नवी मुंबई महापालिकेचे नाव घेतले आहे. या महामार्गालगत जंगली झुडपे, बांधकाम साहित्य, डेब्ा्राrज आणि कचरा पडलेला असतो. यामुळे नवी मुंबईची प्रतिमा मलिन होत आहे. याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार तक्रार करूनही निधी अभावी दखल घेतली जात नाही. हा महामार्ग महापालिकेकडे हस्तांतरित करून घेतल्यास त्याची चांगल्या प्रकारे देखभालदुरुस्ती करून निगा राखली जाईल. नागरिकांना चांगली सेवा दिल्याने शहराचे नावलौकीक होईल, असे प्रशासनाने याप्रस्तावाद्वारे स्पष्ट केले होते.

विशाल डोळस म्हणाले की, आमच्या विभागात शाळेसमोरच्या भूखंडावर डेब्ा्रिज पडले आहे. त्यामुळे शहराची प्रतिमा मलीन होत नाही का, ते भूखंडदेखील सिडकोकडून हस्तांतरित करवून घ्यावे आणि डेब्ा्रिज काढावे. जयवंत सुतार म्हणाले की, शिरवणे अंडरपास नादुरुस्त झाल्याप्रकरणी साबांविच्या कार्यकारी अभियंत्यांना भेटलो तेव्हा त्यांनी तुम्ही रस्ता रोको आंदोलन करा, आमच्याकडे निधी नाही, अशी वल्गना केली होती. अखेर चर्चेअंती सर्वानुमते हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

Related posts: