|Saturday, January 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » रिध्दी-सिध्दीचा स्पेनला जाण्याचा मार्ग मोकळा

रिध्दी-सिध्दीचा स्पेनला जाण्याचा मार्ग मोकळा 

उल्हासनगर महापालिकेकडून प्रत्येकी 1 लाख 33 हजार रुपये अनुदान

तबला वादन आणि शास्त्राrय संगीतात उल्हासनगरचे नाव उज्ज्वल करणाऱया जुळ्या बहिणी रिध्दी-सिध्दी निलेश बोरकर यांचा स्पेन-युरोप येथे होणाऱया स्पर्धेत भाग घेण्याचा मार्ग उल्हासनगर महानगरपालिकेमुळे अखेर मोकळा झाला आहे. महापालिकेच्यावतीने त्यांना प्रत्येकी 1 लाख 33 हजार 100 रुपयांचे अनुदान देण्यात आले. सिद्धी ही तबला वादनात तर रिद्धी ही शास्त्राrय गायन कलेत पारंगत आहे.

पुण्याच्या अखिल भारतीय सांस्कृतिक संघाने तीन वर्षांपूर्वी आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत 20 राज्यांतून आलेल्या 8500 स्पर्धकांतून सिद्धीने तबलावादनमध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता. तर, रिद्धीने शास्त्राrय संगीतात द्वितीय क्रमांक पटकावला होता. या अपूर्व यशामुळे 2014 मध्ये सिंगापूर येथे संपन्न होणाऱया आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी दोन्ही भगिनींची भारतीय चमुत निवड झाली होती. याच दोन्ही जुळ्या बहिनींना पुन्हा एकदा 21 ते 26 नोव्हेंबरदरम्यान स्पेन-युरोप येथे होणाऱया आंतरराष्ट्रीय सातव्या कल्चरल ‘ऑलिंपिक ऑफ परफॉमिंग आर्ट’ या स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळाली. पण स्पर्धेसाठी लागणारे साडेचार लाख रुपये आणायचे कुठून, ही समस्या होती. दरम्यान, निलेश बोरकर यांनी अंबरनाथचे आमदार डॉ.बालाजी किणीकर यांच्यासह शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली. यावेळी सांस्कृतिक खात्याकडून अनुदान मिळेल, असे आश्वासन मिळाले होये. मात्र, अपेक्षा भंग झाला. त्यानंतर स्थानिक शिवसेना नगरसेवक सुनील सुर्वे यांच्या प्रयत्नाने उल्हासनगर महापालिकेने रिद्धी-सिद्धीला प्रत्येकी 1 लाख 33 हजार 100 रुपयांचे अनुदान आयुक्त राजेंद्र निंबाळकर, महापौर मीना आयलानी, माजी आमदार कुमार आयलानी, विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक भगवान भालेराव यांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आला.

Related posts: