|Monday, October 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » सिंधुताई सपकाळ यांना क्रियाशील ग्लोबल अवॉर्ड

सिंधुताई सपकाळ यांना क्रियाशील ग्लोबल अवॉर्ड 

मुंबई / प्रतिनिधी

‘सद्गुरू मंगेशदा क्रियायोग फाऊंडेशन’तर्फे 24व्या वर्धपनदिनी नुकतेच मुंबईत ‘क्रियाशील ग्लोबल ऍवॉर्ड‘ प्रदान करण्यात आले. यंदा सामाजिक कार्यातील भरीव कामगिरीसाठी डॉ. सिंधुताई सपकाळ आणि शैक्षणिक कार्यातील योगदानासाठी  नोरीना फर्नांडिस यांना सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात फाऊंडेशनच्या सदस्यांनी सादर केलेल्या नफत्य, गायन आणि वादनाच्या कार्यक्रमांने झाली. यावेळी सन्मान सोहळय़ात सिंधुताई सपकाळ म्हणाल्या की, मंगेशदांसारखे व्यक्तिमत्त्व अतिशय दुर्मिळ आहे. त्यांचे कार्य चांगले आहे आणि त्याचे कौतुक आहे. मला हा पुरस्कार माझ्या आयुष्यातील महत्त्वांच्या पुरस्कारांपैकी एक आहे. सुश्री नोरींना फर्नांडिस यांना शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कार देण्यात आला. यावेळी त्या म्हणाल्या, मंगेशदा क्रियायोग फाऊंडेशनचा नि:स्वार्थ प्रेम आणि नि:स्वार्थ क्षमाशीलता हा संदेश प्रत्येकाला आयुष्य जगताना फार महत्त्वाचा असल्याचे सांगितले. या कार्यक्रमास विख्यात शल्यचिकित्सक डॉ. विनायक श्रीखंडे, मुंबईचे माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे आणि दूरदर्शनचे अतिरिक्त संचालक मुकेश शर्मा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

Related posts: