|Thursday, January 17, 2019
You are here: Home » Top News » पाकिस्तानच्या राष्ट्रगीतालाही उभे राहिन : सोनू निगम

पाकिस्तानच्या राष्ट्रगीतालाही उभे राहिन : सोनू निगम 

ऑनलाईन टीम / मुंबई :

सार्वजनिक ठिकाणी राष्ट्रगीत वाजवावे की नाही यावरून सुरू असलेल्या वादात सुप्रसिद्ध पार्श्वगायक सोनू निगम यांनी उडी मारली आहे. ‘कोणत्याही देशाच्या राष्ट्रगीताचा सन्मान केला पाहिजे. उद्या पाकिस्तानचे राष्ट्रगीत सुरू असेल तर मा rसुद्धा तो देश आणि त्या देशातील नागरिकांच्या सन्मानार्थ उभा राहिन’, असे सोनू निगमने म्हटले आहे.

चित्रपटगृहासह सार्वजनिक ठिकाणी राष्ट्रगीत वाजवावे की नाही यावर निर्णय घेण्याची आदेश गेल्या सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले होते. त्याबाबत विचारले असता सोनू निगमने त्यांचे मत मांडले. ‘राष्ट्रगीत हा ठक अस्मितेशी, देशभावनेशी संबंधित आणि संवेदनशीव विषय आहे. चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजवण्याबाबत वेगवेगळी मते आहेत काहींना ते अयोग्य वाटत असेल तर काही जण त्याचे समर्थन करतात हॉटेल किंवा सिनेमागृहात राष्ट्रगीत वाजवू नये, असे माझे मत आहे. असे त्याने सांगितले.

 

Related posts: