|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » leadingnews » लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार , नारायण राणेंना मंत्रीपद?

लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार , नारायण राणेंना मंत्रीपद? 

ऑनलाईन टीम / मुंबई 

राज्य मंत्रिमंडळचा विस्तार लवकरच होणार असून या विस्तारात काही मंत्र्यांना नारळ देणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. त्यामुळे या विस्तारात नारायण राणेंना मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवण्या येत आहे.

मंत्रिमंडळातील जुन्या चेहऱयांना डच्चू देऊन नवीन चेहऱयांना संधी दिली जाणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. राज्यातील भाजप सरकारला 31 ऑक्टोबरला तीन वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने ‘टाईम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी हे वक्तव्य केले आहे.2019च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत बाकी राहिलेले सगळे प्रकल्प पूर्ण होतील. प्रकल्प पूर्ण करायचे ध्येय गाठायला आम्हाला नक्की यश येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी हा विस्तार होणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यामुळे नव्या एनडीएमध्ये नारायण राणे यांना सहभागी करून घेण्याची चिन्हे जास्त आहेत.

 

Related posts: