|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » Top News » अमरावतीत बँक खात्यातून साडे आठ लाख लंपास

अमरावतीत बँक खात्यातून साडे आठ लाख लंपास 

ऑनलाईन टीम / अमरावती :

अमरावती शहरात बँक खात्यातून आठ लाख 60 हजार रूपये लंपास झाल्याची घटना घडली आहे. पासवर्ड किंवा ओटीपी शेअर न करताही झालेल्या या चोरीमुळे खातेदारांसह बँक कर्मचारीही चक्रावले आहेत.

अमरावती शहरातल्या ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ आणि ‘बँक ऑफ इंडिया’ या दोन बँकांमधल्या 9 खातेदारांनी ही तक्रार केली आहे. यातल्या एकाही खातेदाराने आपला गोपनीय क्रमांक कुणालाही दिला नसल्याचे सांगितले आहे. तरीही खात्यातून आपोआप रक्कम लंपास झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही रक्कम हरियाणा, असाम, गुरूग्राम आणि दिल्लीतल्या एटीएम सेंटरमधून काढले जात असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे या हायटेक चोरीच्या फंडय़ाच्या पर्दाफाश करण्याचे आव्हान अमरावतीच्या पोलिसांसमोर आहे.

 

Related posts: