|Saturday, October 20, 2018
You are here: Home » विशेष वृत्त » या गावात सरपंचच नाही !

या गावात सरपंचच नाही ! 

ऑनलाईन टीम / नागपूर :

सरकारच्या निणर्यानंतर राज्यात पहिल्यांदाच सरपंच थेट जनेतेतून निवडण्यात आले. मात्र नागपूर जिह्यात तीन गावे अशी आहेत जिथे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतरही सरपंच निवडलेच गेले नाही.

नारपूरजवळमधील खंडाळा गावात थेट सरपंचपदाची निवडणूक होऊनही हे पद रिक्त आहे. प्रशासनाने सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी रिक्त ठेवले होते. परंतु या गावातून एकही अर्ज आला नाही. सात सदस्य मात्र निवडूण आले.पण सरपंच नसल्याने कारभार ठप्प आहे. खंडाळा गावच्या अवतीभवती सुपीक शेतजमीन असल्यामुळे शहरी लोकांना अनेक फार्म हाऊस उभारले. कालांतराने त्या ठिकाणी शेतीची कामे करण्यासाठी मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधून आदिवासी मजूर आणले. शेतावर झोपडय़ा बांधुन राहणाऱया त्या मजुरांची नावे 2001 आणि त्यानंतर 2011मध्ये जनगणनेत समाविष्ट झाली. 2011च्या जनगणनेनुसार खंडाळा गावात 103 आदिवासी लोक असल्याची नोंद आहे. मात्र , हे सर्व मजुर गावातील मुळ रहिवासी नसल्यामुळे ते आधीच आपल्या मुळ राज्यात परत गेले. पण नाव यादीत तशीच उरली. प्रशासनाने कागदोपत्री नोंदीला ब्रह्मवाक्य मानून यंदा सरपंचपद आदिवासी समाजासाठी राखवि केले. आदिवासी समाजाचा एकही नागरिक गावात राहत नव्हता आणि त्यामुळेच निवडणूक होऊनही हे गाव सरपंचविनाच राहिला.

 

Related posts: