|Saturday, January 19, 2019
You are here: Home » विविधा » अशी केली जाते साहित्य संमेलनाध्यक्षांची निवड

अशी केली जाते साहित्य संमेलनाध्यक्षांची निवड 

ऑनलाईन टीम / पुणे :
यंदाचे ९१वे अखिल भारतीय साहित्य संमेलन बरोडा येथे होणार आहे. यंदाचे साहित्य संमेलन अध्यक्ष कोण होणार याबाबत उत्सुकता असून .संमेलनाध्यक्षांची निवड नक्की कशी होते. याबाबत अनेकांच्या मनात शंका आहे. याच पार्श्वभूमीवर समलेनाध्यक्षांची निवडणूक कशी केली जाते याविषयी जाणून घेऊया.
 • अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन ‘ अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ ’ ही संस्था करते. संमेलनाचे मुख्य आयोजक हे महामंडळ आहे. मराठी भाषा आणि साहित्य या क्षेत्रामध्ये साहित्य प्रचार, प्रसार आणि समन्वय यांचे काम करणारी आद्य संस्था ‘ महाराष्ट्र साहित्य परिषद ’ ( मसाप ), पुणे आहे. मसापची स्थापना इ.स. १९०६ रोजी झाली. त्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये भौगिलिक विविधतेनुसार तीन साहित्य संस्था आकाराला आल्या. १) विदर्भ साहित्य संघ २) मराठवाडा साहित्य परिषद ३) मुंबई मराठी साहित्य संघ या तीन संस्था, आणि म.सा.प. पुणे या चार संस्था अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या प्रमुख संस्था आहेत. या संस्थाना महामंडळाच्या घटक संस्था असे म्हटले जाते. या घटक संस्था सोडून देशाच्या इतर राज्यांमध्ये संपूर्ण राज्यस्तरावर मराठी भाषा आणि साहित्याप्रती काम करणाऱ्या अशा ५ संस्था आहेत. त्यांना महामंडळाच्या समाविष्ट संस्था असे म्हणतात. त्यात १) मराठी साहित्य परिषद, हैदराबाद, तेलंगणा राज्य
  २) कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद, गुलबर्गा, कर्नाटक
  ३) गोमंतक साहित्य सेवक मंडळ, पणजी, गोवा
  ४) मध्य प्रदेश मराठी साहित्य संघ, भोपाळ, मध्यप्रदेश

  ५) छ्त्तीसगड मराठी साहित्य परिषद, बिलासपूर, छ्त्तीसगड यांचा समावेश आहे.

 • संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर होण्याआधी संमेलनाचे ठिकाण निश्चित व्हावे लागते. बऱ्याचदा चालू वर्षीच्या संमेलनामध्ये पुढील वर्षीच्या संमेलनाची निमंत्रणे आलेली असतात. साधारणपणे दरवर्षी साधारणतः जुलै – ऑगस्ट महिन्याच्या सुमारास संमेलनाचे ठिकाण निश्चित होते. ज्या ठिकाणाहून संमेलनाच्या आयोजनासाठी निमंत्रणे आलेली आहेत, त्यांच्या प्रस्तावाची छाननी करून आणि गरजेप्रमाणे तेथे प्रत्यक्ष महामंडळाचे सदस्य भेट देतात. त्यानंतर संमेलनाच्या ठिकाणाची घोषणा होते. त्यानंतर संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची चर्चा सुरू होते.
 • घटक संस्था किंवा समाविष्ट संस्थांच्या एकूण सभासदसंख्येपैकी अक्षरशः दोन ते पाच टक्के सभासदांनाच प्रत्यक्ष संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी मतदान करता येते. घटक, समाविष्ट, संलग्न संस्थांचे मतदार दरवर्षी बदलले जातात. मतदार यादी बदलली जाते. मतदार निवडण्यासाठी कोणतीही अधिकृत चौकट, नियमावली आणि प्रक्रिया नाही. विधान परिषदेप्रमाणे पसंतीक्रम निवडणूक पद्धतीप्रमाणे ही निवडणूक लढविली जाते. संमेलध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी सप्टेंबर उजाडतो. मतदार ऑक्टोबरमध्ये ठरतात आणि त्यानंतर मतदार यादी घेऊन महाराष्ट्रातील चार भौगोलिक विभाग मुंबई, मराठवाडा, विदर्भ, उरलेला महाराष्ट्र, गोवा, गुजरात, कर्नाटक, हैदराबाद, छत्तीसगड आणि मध्यप्रदेश इ. १० क्षेत्रांमध्ये उमेदवाराने भेटी देऊन मतदारांशी संपर्क साधायचा अशी सध्याची पद्धत आहे. त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणी झाल्यानंतर संमेलनाध्यक्षपदावर शिक्कामोर्तब होते. यंदाच्या निवडणुकीबाबतही उत्सुकता आहे.

Related posts: