|Thursday, January 18, 2018
You are here: Home » Top News » भाजप खासदार नाना पटोले ‘मातोश्री’वर

भाजप खासदार नाना पटोले ‘मातोश्री’वर 

ऑनलाईन टीम / मुंबई :

भारतीय जनता पक्षाचे खासदार नाना पटोले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी ‘मातोश्री’वर दाखल झाले आहेत. नाना पटोले आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये विविध मुद्यांवर चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे.

भारतीय जनता पक्षातील नाराज नेत्यांना एकत्र करण्यासाठी नाना पटोले प्रयत्न करत आहेत. यासाठी त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी वेळ मागितली होती. त्यानुसार नाना पटोले उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी ‘मातोश्री’वर दाखल झाले आहेत. यावेळी उभय नेत्यांमध्ये विविध महत्त्वपूर्ण मुद्यांवर चर्चा केली जाणार आहे. याशिवाय काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचीही नाना पटोले भेट घेणार असून, यासाठी त्यांनी वेळ मागितली असल्याचे सांगितले जात आहे.

Related posts: