|Monday, December 17, 2018
You are here: Home » Top News » फेरीवाल्यांकडून प्रशासनाला 2 हजार कोटींचा हफ्ता ; राज ठाकरेंचा गंभीर आरोप

फेरीवाल्यांकडून प्रशासनाला 2 हजार कोटींचा हफ्ता ; राज ठाकरेंचा गंभीर आरोप 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मुंबईतील फेरीवाल्यांकडून प्रशासनाला 2 हजार कोटींचा हफ्ता देण्यात आल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी केला. तसेच फेरीवाले परत का बसले हे प्रशासनालाच विचारा, असेही राज ठाकरे म्हणाले.

डोबिंवली येथील दौऱयावर असताना आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला. सरकार पैसे नसताना विविध योजना जाहीर करत आहे. सरकारच्या या खोटय़ा ‘अच्छे दिन’चा फुगा लवकरच फुटणार आहे. सत्ताधाऱयांवरील लोकांचा विश्वास संपत चालला असून, भाजपवर टीका होत असल्याने सध्या मुस्कटदाबी सुरु आहे. तसेच शेतकरी कर्जमाफी हे निव्वळ मूर्ख बनवण्याचे काम आहे. सरकारच्या या धोरणामुळे देशाची अर्थव्यवस्था गर्भगळित होऊन बसल्याचा आरोपही राज ठाकरेंनी केला.

दरम्यान, सर्व काही व्यवस्थित असताना जीएसटीचा घाट का घातला, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

 

Related posts: