|Wednesday, December 12, 2018
You are here: Home » उद्योग » दुबईत स्थावर संपत्तीत भारतीयांची सर्वाधिक गुंतवणूक

दुबईत स्थावर संपत्तीत भारतीयांची सर्वाधिक गुंतवणूक 

वृत्तसंस्था/ मुंबई

संयुक्त अरब अमिरातीतील दुबईमध्ये स्थावर संपत्तीमध्ये गुंतवणूक करण्यास भारतीय सर्वोच्च स्थानी आहे. भारतीयांनी दुबईतील स्थावर संपत्तीमध्ये सर्वाधिक विदेशी गुंतवणूक केली आहे. जानेवारी 2016 ते जून 2017 या कालावधीत भारतीयांनी 42 हजार कोटी रुपयांची अस्थावर संपत्ती खरेदी केली. 2014 मध्ये भारतीयांनी 12 हजार कोटी रुपयांचे भूखंड खरेदी केल्याचे दुबई लँड डिपार्टमेन्टने म्हटले.

दुबईमध्ये स्थावर मालमत्ता खरेदी करण्यासाठी भारतीय पसंती देत आहे. विदेशी गुंतवणूक प्रकारात भारतीयांनी 5.6 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली, तर सौदी अरेबियाने 3.4 अब्ज डॉलर्सच गुंतवणूक केली आहे. 2002 मध्ये विदेशी नागरिकांना स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करण्यासाठी तेथील सरकारकडून परवानगी देण्यात आल्यानंतर दुबईमध्ये संपत्ती घेण्याच्या प्रमाणात वेगाने वाढ होत आहे. त्यामुळे तेथील जमिनीच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. 2009 मध्ये आंतरराष्ट्रीय आर्थिक मंदी आल्यानंतर कर्जात बुडालेल्या देशाला अर्थव्यवस्था अजून खुली करावी लागली होती.

2012 ते 2014 दरम्याने पर्यटन, व्यापार आणि दळणवळणात वाढ झाल्याने स्थावर संपत्ती खरेदी करण्याचे प्रमाण वाढले. 2014 पासून खनिज तेलाच्या किमती घसरल्यास प्रारंभ झाल्याने अर्थव्यवस्थेला दणका बसला. यामुळे दुबईतील घरांच्या किमती आणि भाडे 15 टक्क्यांपेक्षा जास्तने घसरले होते. भारतीय दुबईमध्ये सेकंड होमसाठी उत्तम संधी असल्याचे मानतात. 63 भारतीय दुबईमध्ये 1,500 चौरस फुटाच्या घराला प्राधान्य देतात. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदा भारतीय रुपया मजबूत झाल्याने किफायतशीर घर खरेदी करणे सोपे झाले आहे. 77 टक्के भारतीय दहा लाख डॉलर्सपेक्षा कमी किमतीच्या घरांना पसंती देतात.

Related posts: