|Monday, October 22, 2018
You are here: Home » उद्योग » बंदर हिरा प्रकल्पासाठी वेदान्ता, अदानी इच्छुक

बंदर हिरा प्रकल्पासाठी वेदान्ता, अदानी इच्छुक 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

धातू आणि खाण क्षेत्रातील प्रमुख कंपनी वेदान्ता लिमिटेड आणि अदानी समूह मध्य प्रदेशातील बंदर हिरा प्रकल्पासाठी बोली लावतील असे संकेत देण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरील रियो टिंटा कंपनीने या प्रकल्पातून काढता पाय घेतला आहे. अदानी समूह आणि वेदान्ता या दोन्ही कंपनी या हिरा प्रकल्पात गुंतवणूक करण्यास इच्छुक असल्याचे सांगण्यात आले आहे. दोन्ही कंपनीतील अधिकाऱयांनी या प्रकल्पाला भेट दिल्याचे सांगण्यात आले आहे.

या प्रकल्पासाठी नोव्हेंबर महिन्यात निविदा जारी करण्यात येणार असून ती ऑनलाईन प्रक्रिया असेल असे मध्य प्रदेशच्या खाण विभागाचे सचिव मनोहर लाल दुबे यांनी सांगितले. भारतीय खाण विभागाच्या माहितीनुसार या प्रकल्पातून 60 हजार कोटी रुपयांचे हिरे काढता येतील असे सांगण्यात आले आहे. चालू महिन्यात मध्य प्रदेश सरकारने मुंबईमध्ये भागीदारांबरोबर बैठक घेतली होती. या बैठकीत हिरा प्रकल्पासह 10 योजनांवर चर्चा करण्यात आली होती.

Related posts: