|Monday, October 15, 2018
You are here: Home » उद्योग » आयफोन एक्स स्टॉकची 15 मिनिटात विक्री

आयफोन एक्स स्टॉकची 15 मिनिटात विक्री 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतात आयफोन एक्स या मॉडेलची शुक्रवारपासून नोंदणी सुरू झाली असून एक लाख रुपये किंमत असणाऱया या महागडय़ा स्मार्टफोनला भारतीयांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्मार्टफोनची नोंदणी सुरू झाल्यानंतर केवळ 15 मिनिटात स्टॉफ ऑऊट झाल्याचे सांगण्यात आले. देशात 64 जीबीच्या मॉडेलची किंमत 89 हजार रुपये आणि 256 जीबीसाठी 1 लाख 02 हजार रुपये मोजावे लागणार आहेत. फ्लिपकार्टवर या स्मार्टफोनच्या खरेदीबरोबर कॅशबॅक देण्यात येत आहे. याव्यतिरिक्त कंपनीकडून ईएमआयचा पर्याय देण्यात आला आहे. तीन वर्षांसाठी ईएमआय घेतल्यास प्रतिमहिना 3,042 रुपये हप्ता द्यावा लागेल. पुन्हा नवीन स्टॉक कधी दाखल होईल याबाबत कंपनीकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. या फोनमध्ये फेस आयडीचा वापर करण्यात आला असून वापरकर्त्याचा चेहरा ओळखण्यास मदत होते. मात्र स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनरचा समावेश नाही.

Related posts: