|Saturday, January 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » दार्जिलिंगमधून निमलष्करी दल हटवण्यास मान्यता

दार्जिलिंगमधून निमलष्करी दल हटवण्यास मान्यता 

सर्वोच्च न्यायालयाच्या सुचनेनुसार 7 तुकडय़ा मागे घेणार

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

दार्जिलिंग व कालिंगपोंग या पहाडी भागात तैनात करण्यात आलेल्या निमलष्करी दलाच्या 7 कंपन्या हटवण्यास सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे. केंद्र सरकार त्यानुसार कार्यवाही करणार असून सुरक्षेसाठी अद्याप तेथे 8 कंपन्या तैनात राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच पश्चिम बंगाल सरकारला याबाबत जबाब दाखल करण्याच्याही सूचना दिल्या असून कोलकाता न्यायालयाच्या निर्णयाला विरोध केला आहे. तसेच याची पुढील सुनावणी 27 नोव्हेंबरला होणार आहे.

या भागातील निमलष्करी दलाच्या तुकडय़ा हटवण्याची परवानगी केंद्र सरकारने मागितल्यानंतर पश्चिम बंगाल सरकारने त्याला विरोध दर्शवला होता. सुरक्षेच्या कारणास्तव तेथून तुकडय़ा हटवू नयेत, असे सरकारचे म्हणणे होते. याबाबत कोलकाता उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला तुकडय़ा न हटवण्याचे आदेश दिल्यानंतर संरक्षण मंत्रालयाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. केंद्र सरकारच्यावतीने एएसजी मनिंदरसिंग यांनी बाजू मांडताना सांगितले की, केंद्राला तेथील परिस्थितीबाबत काळजी आहेच. परंतु तेथील अतिरिक्त दल हटवून जम्मू काश्मीर व अन्य सीमावर्ती प्रदेशात तैनात करू इच्छित असल्याचे सांगितले. आता याची पुढील सुनावणी 27 नोव्हेंबरला होत आहे.

Related posts: