|Friday, October 19, 2018
You are here: Home » Top News » पाणी पुरवणाऱया टाकीत पाच दिवसांपासून मृतदेह

पाणी पुरवणाऱया टाकीत पाच दिवसांपासून मृतदेह 

ऑनलाईन टीम / नाशिक  :

नाशिकरांना पाणी पुवठा करणाऱया पाण्याच्या टाकीत पाच दिवसपांसून मृतदेह पडला होता. पंचवटी पोलिसांनी एका हत्या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर हे धक्कादायक सत्य समोर आले आहे. त्यामुळे नाशिकरांची झोप उडाली आहे.

दशरथ बाळू ठमके असे पाण्याच्या टाकीत सापडलेल्या मृत इसमाचे नाव आहे. दशरथ 21 तारखेपासून बेपत्ता होता, दशरथचे ज्या महिलेशी अनैतिक संबंध होते त्या महिलेच्या पतीने तीन साथीदारांच्या मदतीने दशरथची हत्या केली. गुन्हा लपवण्यासाठी मारेकरांनी डाळींब मार्केटमधल्या पाण्याच्या टाकीत मृतदेह लपवल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे नाशिकरांना पाच दिवसांपासून मृतदेह पडलेल्या टाकीतले पाणी प्यावे लागल्याने खळबळ उडाली आहे.

 

Related posts: