|Thursday, January 17, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

29 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर 2017

मेष

बुधाचे राश्यांतर धंद्यात थोडय़ा अडचणी निर्माण करणार आहे. कायद्याच्या कचाटय़ात अडकणार नाही याची काळजी घ्या. जीवनसाथीच्या विचारांना महत्त्व द्या.  परिवाराबरोबर बाहेर जाण्याचा योग जुळून येईल. खरेदी कराल. आरोग्याची थोडी काळजी घ्या. राजकीय सामाजिक क्षेत्रातील क्यक्तींना शत्रुपक्षाचा त्रास थोडा काळ सहन करावा लागेल. पण प्रति÷sला धक्का पोहचणार नाही. शेतीच्या कामात यश मिळेल. वाहन खरेदी करण्याचा विचार मनात येईल.


वृषभ

नोकरीत आपली जागा टिकवून ठेवावी लागेल. मान-अपमान सहन करावा लागेल. आर्थिक लाभ कमी जरी झाला तरी थोडय़ा प्रमाणात जो होत  आहे तो कायमचा बंद होणार नाही याची काळजी घ्या. धंद्यात नवीन ओळखी करून वाढविण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त कष्ट घ्यावे लागणार आहेत, तरच यश प्राप्त होईल. काळ थोडा कसोटीचा आहे. अपयश आले तरी डगमगून जाऊ नका. देवाची उपासना करा. शंकराचा जप केल्याने काही संकटे दूर होतील.


मिथुन

कला, क्रीडा क्षेत्रात नाटय़चित्रपट क्षेत्रात चांगली संधी मिळेल. बुध, शुक्राचे राश्यांतर होत आहे. या आठवडय़ात नोकरीत चांगले बदल संभवतात. वरि÷ांकडून कौतुक होईल. एखादा पुरस्कार मिळण्याची शक्मयता आहे. शेतीच्या कामात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करा. ऑरगॅनिक शेतीत जास्त फायदा संभवतो. सामाजिक कार्याकडे दुर्लक्ष करू नका. नवीन ओळखी करून घ्या. नवीन व्यवसाय सुरू करण्यास चांगला काळ आहे. प्रवासाचे बेत आखले जातील.


कर्क

वृश्चिक राशीत, बुध व तुळेत शुक्र प्रवेश करीत आहे. सोमवार, मंगळवार तुमच्या कामात किरकोळ अडचणी येऊ शकतात. धंद्यात सुधारणा करता येईल. शेतकरी वर्गाला बुधवारपासून योग्य निर्णय घेता येईल. राजकीय, सामाजिक कार्याला चांगला प्रतिसाद मिळेल. लोकप्रियता वाढवण्यासाठी लोकांची कामे करा. यश मिळेल. कोर्टकेसमध्ये मार्ग मिळेल. विद्यार्थीवर्गाला प्रगती करता येईल. संसारात सुखाचे क्षण येतील. भेटी होतील.


सिंह

वृश्चिक राशीत बुध व तुळेत शुक्राचे राश्यांतर होत आहे. बुधवार, गुरुवार धंद्यात वाद व तणाव होईल. समस्या रागाने सुटणार नाही. प्रेमाने मार्ग मिळेल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचा प्रभाव वाढेल. प्रति÷ा मिळेल. अविवाहितांना लग्नासाठी स्थळे मिळतील. प्रेमाला योग्य वळण देता येईल. कला, क्रीडा क्षेत्रात प्रगतीची मोठी संधी मिळेल. शिक्षणात मनाप्रमाणे प्रगती करता येईल. घर, वाहन, जमीन इ. खरेदीचा विचार कराल.


कन्या

या सप्ताहात मनाविरुद्ध घटना घडण्याची शक्मयता आहे. मनस्ताप होऊ शकतो. राग वाढेल. प्रकृतीची काळजी घ्या. सर्व तात्पुरत्या स्वरुपाचे असेल. वृश्चिकेत बुध व तुळेत शुक्राचे राश्यांतर होत आहे. धंद्यात संधी मिळेल. किरकोळ वाद होऊ शकतो. नोकरीची संधी मिळेल. शेतकऱयाला धंद्यात फायदा होईल. राजकीय, सामाजिक कार्यात प्रगती होईल. आर्थिक लाभ होईल. कला, क्रीडा क्षेत्रात टिकाव धरून रहा. यश मिळेल. विद्यार्थी वर्गाने वाहन जपून चालवावे.


तूळ

साडेसाती संपलेली आहे. धनस्थानात बुध व तुळेत शुक्र प्रवेश करीत आहे. तुमच्या क्षेत्रात चोफेर प्रगती करण्याचा योग येईल. प्रयत्न सुरू ठेवा. बुधवार, गुरुवारी रागावर नियंत्रण ठेवा. दुखापत संभवते. राजकीय, सामाजिक कार्यात प्रति÷ा मिळेल. लोकांच्या समस्या सोडवता येतील. धंद्यात विशेष प्रगती करण्याची संधी मिळेल. कला क्रीडा क्षेत्रात चमकाल. शिक्षणात प्रगतीचा मार्ग मिळेल. परदेशात जाण्याचा योग येईल. कोर्टकेस संपण्याची आशा वाढेल. विवाहयोग येईल.


वृश्चिक

तुमच्या राशीत बुध व तुळेत शुक्र प्रवेश करीत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला महत्त्वाची कामे करण्याचा प्रयत्न करा. शुक्रवार, शनिवार धावपळ होईल. वेळ कमी पडेल. तणाव व गैरसमज होण्याची शक्मयता संसारात, नोकरीत आहे. राजकीय- सामाजिक कार्यात सावधपणे बोला. अधिकारी थाटात वागल्यास आरोप वाढतील. कौटुंबिक वाटाघाटीत कटकटी होऊ शकतील. प्रेमात गैरसमज होईल. प्रकृतीची काळजी घ्या. खाण्यापिण्याचे तंत्र सांभाळा. विद्यार्थीवर्गाने जास्त मेहनत घ्यावी.


धनु

साडेसातीचा पहिला टप्पा संपला आहे. वृश्चिकेत बुध व तुळेत शुक्राचे राश्यांतर होत आहे. धंद्यात कामगारांची कमतरता राहील. किरकोळ वाद होतील. संसारात जबाबदारी वाढेल. गोड बोलून तुमचा वापर करण्याचा प्रयत्न होईल. नोकरीत प्रगती होईल. परदेशात जाण्याचा योग येईल. राजकीय, सामाजिक कार्यातील अडचणी लवकर मिटवा. आळस सोडून कार्यावर लक्ष द्या. प्रति÷ा वाढेल. विवाहासाठी चांगली स्थळे मिळू शकतील. कोर्टकेसमध्ये मुद्देसूद बोला. शिक्षणात यश मिळेल.


मकर

मकर राशीला साडेसातीचे पहिले पर्व सुरू झाले आहे. चोख काम करा. सप्ताहात उत्साह व आत्मविश्वास वाढेल. लोकांचे सहकार्य मिळेल. वृश्चिकेत बुध व तुळेत शुक्र प्रवेश करीत आहे. राजकीय, सामाजिक कार्यात प्रभाव वाढेल, असे कार्य करा. गरजा ओळखा, लोकांची मने जिंका, धंद्यात वाढ होईल. कोर्टकेसमध्ये सरशी  होईल. योग्य मुद्दे हाती येतील. प्रयत्न करा. केस संपवा. संसारात मनाप्रमाणे घटना घडतील. मुलांची प्रगती होईल. शिक्षणात प्रगती होईल.


कुंभ

रविवारी वादाला जास्त महत्त्व देऊ नका. त्यानंतर समस्या सुटेल. वृश्चिकेत बुध व तुळेत शुक्र प्रवेश करीत आहे. तुम्ही ठरविलेला कार्यक्रम योग्य प्रकारे पूर्ण करता येईल. प्रवासात सावध रहा. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढत जाईल. गुप्तशत्रू चकित होतील. धंद्यात जम बसेल. थकबाकी वसूल करा. संसारात आनंदाची बातमी मिळेल. शुभ कार्याचे ठरेल. संततीची प्रगती होईल. दूरच्या प्रवासाचे बेत ठरवाल.


मीन

सोमवार, मंगळवार मनाविरुद्ध घटना घडेल. प्रेमात तणाव येईल. प्रकृतीची काळजी घ्या. औषध वेळेवर घ्या. वृश्चिकेत बुध व तुळेत शुक्र प्रवेश करीत आहे. धंद्यात मोठी संधी मिळेल. विचारपूर्वक निर्णय घ्या. गुंतवणूक करतांना सल्ला घ्या. शेअर्समध्ये या सप्ताहात फायदा होईल. राजकीय, सामाजिक कार्यात मेहनत घ्यावी लागेल. आरोप होईल संयम ठेवा. मनोबल टिकून राहील. नोकरीत कामात चूक होऊ शकते. बेकायदा कृत्य करू नका. अडचणी वाढतील. विद्यार्थीवर्गाने कष्ट व प्रामाणिकता ठेवावी. गुरु स्मरण करावे.

Related posts: