|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » Top News » राहुल गांधी निर्बुद्ध, चिदंबरम देशद्रोही : सुब्रमण्यम स्वामी

राहुल गांधी निर्बुद्ध, चिदंबरम देशद्रोही : सुब्रमण्यम स्वामी 

ऑनलाईन टीम / डोंबिवली :

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी अजूनही निर्बुद्ध आहेत. तर माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम हे देशद्रोही आहेत, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी टीका केली.

डोंबिवली येथे आयोजित कार्यक्रमात सुब्रमण्यम स्वामी बोलत होते. ते म्हणाले, मशिदीत फक्त नमाज पठण करतात. जो कुठेही पठण केला जाऊ शकतो. मात्र, राममंदिर हे रामजन्मभूमीतच उभे राहणार असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. तसेच याबाबत न्यायालयात सुरु असलेल्या खटल्यात आपणच जिंकू. मात्र, जर या मुद्यावर श्री श्री रविशंकर मध्यस्थी करुन तोडगा काढणार असतील, तर त्यांचे स्वागत असेल, असे स्वामी म्हणाले.

काश्मीरला अधिक स्वायत्तता देण्याची पी. चिदंबरम यांची मागणी देशद्रोही आहे. चिदंबरम यांची लवकरच जेलमध्ये रवानगी होणार आहे. तसेच त्यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल करत ते म्हणाले, माझ्या लेखी राहुल गांधी निर्बुद्ध आहेत.

Related posts: