|Tuesday, January 23, 2018
You are here: Home » मनोरंजन » जगण्याचा अर्थ उलगडून सांगणारा ‘थँक यू विठ्ठला’

जगण्याचा अर्थ उलगडून सांगणारा ‘थँक यू विठ्ठला’ 

विषयातील आणि मांडणीतील वेगळेपण हे आजच्या मराठी चित्रपटांचे वैशिष्टय़ ठरत आहे. असंख्य स्वप्नं घेऊन जगणाऱया आणि रोजच्या जगण्याशी दोन हात करणाऱया एका अवलियाची गोष्ट रंजकपणे मांडणारा ‘थँक यू विठ्ठला’ हा मराठी चित्रपट येत्या 3 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. जगण्याचा अर्थ उलगडून सांगणारा ‘थँक यू विठ्ठला’ हा चित्रपट एम. जी. के प्रोडक्शनची प्रस्तुती असून या चित्रपटाची निर्मिती गोवर्धन काळे, गौरव काळे व अंजली सिंग यांनी केली आहे. कथा व दिग्दर्शन देवेंद्र जाधव यांचे आहे.

एखाद्या माणसाने जर मनाशी पक्के ठरवले तर तो आयुष्यात कुठल्याही समस्येवर मात करून यशस्वी होऊ शकतो. ही या चित्रपटाची मध्यवर्ती संकल्पना आहे. प्रत्येकाला नेहमीच दुसऱयाच्या आयुष्याचा हेवा वाटत असतो. इतरांसारखं आयुष्य आपल्या वाटय़ाला नाही, याबद्दल तक्रार करत आपल्या हाती असलेलं सहज सुंदर जगणंही हल्ली प्रत्येकजण विसरून गेलं आहे. ‘थँक यू विठ्ठला’ या चित्रपटातही आयुष्याला कंटाळलेल्या एका व्यक्तीचा प्रवास असून या प्रवासात त्याला मिळालेल्या विठ्ठलाच्या साथीमुळे काय बदल घडतो? याची रंजक कथा या चित्रपटात पाहता येईल. या चित्रपटात निर्माते, अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर चक्क पंढरपूरनिवासी श्री विठ्ठलाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्यासोबत मकरंद अनासपुरे मुंबईच्या डबेवाल्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. या दोघांसोबत दीपक शिर्पे, कमलेश सावंत, स्मिता शेवाळे, सुनील गोडबोले, प्रदीप पटवर्धन, किशोर चौघुले, जयवंत वाडकर, योगेश शिरसाट, अभिजीत चव्हाण, मौसमी तोंडवळकर, पूर्वी भावे, तेजा देवकर, याकुब सय्यद, अरुण घाडीगावकर, अरुण टकले, संतोष केवडे, मिलिंद सफई, सतीश सलागरे, संग्राम सरदेशमुख, राजेंद्र जाधव, शैलेश पितांबरे, अंतून घोडके, आनंद जोशी, अमीर शेख, मनीषा राऊत, शिवा व बालकलाकार वरद यांच्या भूमिका आहेत.

सादरीकरण आणि मांडणीत वैविध्य असलेल्या या सिनेमाचे संगीत देखील रिफ्रेशिंग झालंय. विजय शिंदे, दीपक कांबळी, मच्छींद्र मोरे यांच्या लेखणीतून साकारलेल्या यातील गीतांना रोहनल्ल्रोहन यांनी संगीतबद्ध केलं आहे. ‘मोबाईल’, ‘विठ्ठल विठ्ठल विठ्ठला’ आणि ‘लोणचं’ अशी वेगवेगळय़ा जाँनरची तीन गाणी या चित्रपटात आहेत. उत्तम स्टारकास्ट, दमदार संगीत असलेल्या ‘थँक यू विठ्ठला’ या चित्रपटातील सुमधूर गीतांचा हा नजराणा प्रेक्षक नक्कीच एन्जॉय करतील. झी म्युझिक कंपनीने ‘थँक यू विठ्ठला’ चित्रपटातील गाणी प्रकाशित केली आहेत. चित्रपटाचे सहनिर्माते एम. सलीम असून पटकथा ही त्यांचीच आहे. संवाद एम. सलीम व योगेश शिरसाट यांचे आहेत. छायांकन दिनेश सिंग तर संकलन अजय नाईक यांचे आहे. कलादिग्दर्शन अनिल गुंजाळ यांनी केलं असून वेशभूषा लक्ष्मण गोल्लार यांची आहे. ग्राफिक्स अरविंद हतनुरकर यांचं तर साऊंड इंजिनिअर विजय भोपे आहेत. नफत्यदिग्दर्शन गणेश आचार्य यांनी केले आहे. कार्यकारी निर्माते जितेंद्र कुलकर्णी आहेत.

Related posts: