|Saturday, January 19, 2019
You are here: Home » मनोरंजन » प्रेम नाथ यांच्या 25 व्या पुण्यतिथीनिमित्त चित्रपट महोत्सव

प्रेम नाथ यांच्या 25 व्या पुण्यतिथीनिमित्त चित्रपट महोत्सव 

झी क्लासिक प्रेम नाथ यांच्या 25व्या पुण्यतिथी निमित्त या नोव्हेंबर मध्ये प्रेम नाथ फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करत आहे. कर्ज (1980) मधील ग्लासवर बोटाने वाजवून संवाद साधणारा प्रसिद्ध खलनायक असो किंवा संन्यासी (1975) मधील घाबरवून सोडणारा संत असो, जेव्हा प्रेम नाथचे नाव घेतले जायचे तेव्हा 70 आणि 80 च्या दशकात प्रत्येक घरात भीतीचे वातावरण असायचे. प्रेम नाथ या विख्यात अभिनेत्याने अनेक प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. तो जबरदस्त कॉमेडियन होता. त्यांच्या 25 व्या पुण्यतिथी निमित्त या अभिनेत्याची स्मफती जागविण्यासाठी, झी क्लासिक वो जमाना करे दिवाना या कार्यक्रमांतर्गत प्रेम नाथ फिल्म फेस्टिव्हल हा चार आठवडय़ांचा कार्यक्रम प्रसारित करणार आहे. 3 नोव्हेंबर 2017 पासून प्रेम नाथ यांचे चित्रपट पाहायला मिळणार आहे. या विशेष उपक्रमाचा भाग म्हणून झी क्लासिक अमर प्रेम नाथ नावाचा एक आत्मचरित्रपर माहितीपट दाखविणार आहे आणि तो त्यांच्या मुलाने-मॉन्टी नाथने तयार केला आहे. तसेच तो प्रख्यात प्रेम नाथ सिनेमा नंतर लगेच प्रत्येक शुक्रवारी सकाळी 10.30 वाजता दाखविण्यात येणार आहे.     

प्रेम नाथ यांनी 75 सिनेमे केले होते आणि प्रत्येक सिनेमात त्यांनी वेगळी शैली धाखविली आहे. बहुतेक अभिनेते हिरो बनणे पसंत करतात पण प्रेम नाथ यांनी भीतीदायक खलनायक बनणे पसंत केले. राज कपूर यांनी 1948 मध्ये प्रथम दिग्दर्शित केलेल्या आग या सिनेमातून प्रेम नाथ यांना प्रमुख भूमिकेतून प्रसिद्धी मिळाली होती. तरीसुद्धा त्यांनी एक प्रतिस्पर्धी म्हणून प्रेक्षकांना थरारकतेचा अनुभव देणेच पसंत केले. आत्मचरित्रपर माहितीपट, अमर प्रेम नाथ म्हणजे त्यांच्या मुलाने मॉन्टी नाथने त्यांच्या विषयी व्यक्त केलेली कृतज्ञता आहे. तो स्वत: एक निर्माता असल्यामुळे या आत्मचरित्रपटात त्याने त्याच्या वडीलांचा फिल्म इंडस्ट्रीमधील प्रवास आणि भारताचा लाडका खलनायक म्हणून झालेला उद्य वर्णन केलेला आहे.

या आत्मचरित्रपटाच्या प्रसारणा विषयी बोलताना मॉन्टी नाथ म्हणाले, “ माझ्या डॅडच्याल्ल् श्री. प्रेम नाथजींच्या काळा मध्ये सुद्धा ते द्रष्टे होते. त्यांचा सिनेमा विषयीचा दृष्टिकोन वेगळा होता. त्यांना हिरो बनायचे नव्हते, तर त्यांना त्यांच्या खलनायकाच्या विशिष्ट शैलीने प्रत्येकाचे मनोरंजन करायचे होते, एक विनोदवीर म्हणून सुद्धा ते निष्णात होते. लवकरच दर्शकांना कळून चुकले की प्रेम नाथ रंगवत असलेला विरोधक त्यांना थरारकतेचा अनुभव देत आहे. माझे वडील हे फक्त एक मोठे अभिनेतेच नव्हते तर ते एक चांगले मनुष्य सुद्धा होते हे मला अमर प्रेम कथेतून या पिढीला आणि जगाला दाखवून द्यायचे आहे. मी त्यांच्यावर तयार केलेली 4 भागांची फिल्म सर्वांना दाखविली जाऊ शकते याचा मला आनंद होत आहे. या फिल्ममध्ये दिलीप कुमार, शशी कपूर, रणधीर कपूर, ऋषी कपूर, मनोज कुमार, धर्मेंद्र, जितेंद्र, अशा त्यांच्या सहकलाकारांपैकी 24 जणांचा समावेश आहे, आणि ते त्यांचा जीवनप्रवास दर्शकांना सांगणार आहेत. 3 नोव्हेंबर 2017 रोजी येणारी माझ्या वडिलांची 25 वी पुण्यतिथी आणि 21 नोवेहंबर 2017 रोजी येणारी त्यांची 91 वी जयंती साजरी करण्यासाठी आणि ही फिल्म दाखविण्यासाठी मी झी क्लासिकचा अत्यंत आभारी आहे. जॉनी मेरा नाम, काली चरण, कबिला, गौतम गोविंदा हे चित्रपट दाखविण्यात येणार आहेत.

Related posts: