|Monday, September 24, 2018
You are here: Home » मनोरंजन » झी टॉकिजची हटके मालिका न.स.ते.उद्योग

झी टॉकिजची हटके मालिका न.स.ते.उद्योग 

दोन घटका करमणूक होईल व थोडे खळाळून हसता येईल अशाप्रकारच्या मनोरंजनाची नेहमीच गरज असते. विनोदी कार्यक्रम सर्वच मोठय़ा आवडीने पाहत असतात. हीच गरज हेरून झी टाकीज या चित्रपट वाहिनीने मनोरंजनाच्या क्षेत्रात आणखी एक मोठे पाऊल टाकत न.स.ते. उद्योग हा एक हलका-फुलका विनोदी  कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. मराठी मनोरंजनाच्या दुनियेत आपल्या प्रेक्षकांना सातत्याने नवनवीन दर्जेदार कार्यक्रम देणाऱया झी टाकीज वाहिनीने आणलेल्या न.स.ते. उद्योग या कार्यक्रमातून प्रेक्षकांना धमाल अभिनय, खळखळून हसवणारे संवाद आणि निखळ मनोरंजनाची ट्रीट मिळणार आहे. येत्या 29 ऑक्टोबरपासून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमाद्वारे मराठी सिनेमा आणि नाटकांमधील दिग्गज कलाकार छोटय़ा पडदा गाजवायला येत आहेत. न.स.ते. उद्योग करण्यासाठी सुप्रसिद्ध अभिनेते संजय नार्वेकर आणि त्यांच्याबरोबर निलेश दिवेकर, शेखर फडके, नम्रता आवटे, पंकज पंचारिया, जनार्दन लवंगारे हे विनोदवीर पुढाकार घेणार आहेत. दर आठवडय़ाला एक नवा उद्योग करत या विनोदवीरांचे न.स.ते. उद्योग हास्याची कारंजी फुलवणार आहेत.

शिऱयाच्या भूमिकेतून गाजलेले आणि सध्या हिंदी चित्रपटसफष्टीमध्ये कार्यरत असलेले विकास कदम आपल्या विनोदाचे उत्कृष्ट टायमिंग घेऊन प्रथमच मराठी टेलिव्हिजन शो च्या दिग्दर्शनात उतरत आहेत. विनोदाची चौफेर फटकेबाजी असलेल्या न.स.ते. उद्योग या कार्यक्रमाबद्दल बोलताना झी टाकीजचे बिझनेस हेड बवेश जानवलेकर म्हणाले की, झी टॉकीज ही चित्रपट वाहिनी असली तरी प्रेक्षकांची कॉमेडीची आवड लक्षात घेऊन आम्ही या नवीन कार्यक्रमाची निर्मिती करत आहोत. रोजचे ताणतणाव विसरून दोन घटका मनमुराद हसण्याची संधी या कार्यक्रमातून प्रेक्षकांना मिळत राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. प्रेक्षकांना खळखळून हसवून त्यांचे मनोरंजन करणारा न.स.ते. उद्योग हा नवीन कार्यक्रम दर रविवारी रात्री 9.00 वाजता झी टॉकीजवर पाहता येईल.

Related posts: