|Wednesday, September 26, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » काँगेस बोलत आहे पाकचीच भाषा

काँगेस बोलत आहे पाकचीच भाषा 

प्रतिनिधी/ बेंगळूर

काश्मीरसाठी देशातील हजारो जवानांनी बलिदान दिले आहे. प्रत्येक क्षण मातृभूमीच्या रक्षणासाठी, काश्मीरातील जनतेच्या संरक्षणासाठी अद्यापही बलिदान देत आहेत. मात्र, कालपर्यंत सत्तेवर असलेले आता ‘यू टर्न’ घेऊन काश्मीरच्या स्वातंत्र्याविषयी बोलत आहेत. त्यांची ही भाषा पाकिस्तानप्रमाणेच आहे. ही  दुटप्पी भूमिका लज्जास्पद आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचा समाचार घेतला. ते येथे विमानतळ परिसरात भाजप कार्यकर्त्यांच्या सभेत बोलत रविवारी बोलत होते.

रविवारी त्यांचा कर्नाटकचा एक दिवसाचा दौरा पार पडला. त्यात त्यांनी प्रथम धर्मस्थळ, नंतर उजिरे येथे जाहीर कार्यक्रम, बेंगळूरमधील पारायणोत्सव तर बिदर येथे बिदर-गुलबर्गा रेल्वे मार्गाचे लोकार्पण आणि कार्यकर्ता मेळावा अशा कार्यक्रमांमध्ये भाग घेतला.

बेंगळूरमधील सौंदर्य लहरी पारायणोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी ते येथील एचएएल विमानतळावर रविवारी दुपारी दाखल झाले. याप्रसंगी भाजप कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. ज्या मातेने मातृभूमीसाठी पुत्र गमावला, ज्या भगिनीने बंधू आणि पित्याने मुलगा गमावला ते सर्वजण प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यांना काँग्रेसने स्पष्टीकरण दिलेच पाहिजे. हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा देश आहे. सर्जिकल स्ट्राईक झाले. मात्र, काँग्रेस पक्ष यावर अजूनही विश्वास ठेवत नाही. भारतातील सैन्याचा पराक्रम जगाला माहित झाला आहे. तरीसुद्धा काँग्रेस नेते डोकलाम प्रश्नी खोटय़ा वावडय़ा उठवत आहेत. भाजप सत्तेवर आल्यानंतर काँग्रेस पक्ष सुधारेल अशी आशा बाळगली होती. मात्र, ते चुका दुरुस्त करण्यासाठी धजावत नाहीत. दिवसेंदिवस त्यांचा अहंकार वाढत आहे, अशी टिप्पणीही मोदींनी केली.

एकात्मतेची संस्कृती

आदी शंकराचार्य यांच्या परिकल्पनेतील संस्कृती आजही अस्तित्वात आहे. ही संस्कृतीच ‘सबका साथ, सबका विकास’ आहे. भारतीय संस्कृती धोक्यात असताना प्रत्येक वेळी शंकराचार्यांनी योगदान दिले. भारतीय संस्कृतीची पुनर्प्रतिष्ठापना करून त्यांनी देशाची एकता अबाधित राखली, असे मत नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. बेंगळूरमधील राजवाडा मैदानावर आयोजित सौंदर्य लहरी पारायणोत्सवामध्ये सहभागी झाल्यानंतर ते बोलत होते.

जगातील सर्व समस्यांवर भारतीय संस्कृतीमध्ये योग्य तोडगा आहे. देशावर अनेकवेळा हल्ले झाले. परंतु येथील संस्कृती नष्ट करणे कुणालाही शक्य झाले नाही. स्वातंत्र्यानंतर संस्कृती जपण्याचे कार्य होणे आवश्यक होते. मात्र, ते झाले नाही. मोबाईल क्रांतीच्या जमान्यात देखील युवा पिढीपर्यंत संस्कृतीबाबतचा विचार कुणापासून पोहोचला, असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी स्वामीजी आणि वेदांत भारतीद्वारे देशातील संस्कृतीचे वैभव युवा पिढीपर्यंत पोहोचविण्यात येत असल्याविषयी त्यांनी गौरवोद्गार काढले.

कर्नाटकातील जनतेला निवडणुकीचे वेध

कर्नाटकातील जनता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अधिक वेळ प्रतीक्षा करण्याच्या मन:स्थितीत नाहीत. देशातील इतर राज्यांप्रमाणेच कर्नाटक राज्य देखील विकासाच्या यादीत सामील होण्यासाठी आतुर आहे. पुढील निवडणुकीनंतर कर्नाटक विकासाच्या मुख्य प्रवासात समाविष्ट होणार आहे, असे ते म्हणाले. याप्रसंगी भाजप प्रदेशाध्यक्ष येडियुराप्पा, केंद्रीय मंत्री अनंतकुमार, सदानंदगौडा, आर. अशोक, राज्य भाजपचे मुख्य सचिव अरविंद लिंबावळी आदी उपस्थित होते.

 याप्रसंगी विमानतळावर राज्यपाल वजुभाई वाला, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, राज्य सरकारचे मुख्य सचिव सुभाषचंद्र कुंटीया, बेंगळूरचे महापौर संपत राज आणि केंद्रीय मंत्र्यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले.

बिदर येथे रेल्वेमार्गाचे लोकार्पण

बिदर-गुलबर्गा दरम्यानच्या नव्या रेल्वे मार्गाचे उद्घान करताना आपल्याला अत्यान्sंद होत आहे. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना या योजनेला मंजुरी मिळाली होती. आता ही योजना प्रत्यक्षात आही आहे या योजनेसाठी येडियुराप्पा येंनी भरपूर मेहनत घेतली आहे. त्याबद्दल त्यांचे आपण अभिनंदन करीत आहे, असे नरेंद मोदी म्हणाले.

बिदर-गुलबर्गा दरम्यानच्या नव्या मार्गाला त्यांनी रविवारी हिरवे निशाण दाखविले. बिदर येथे वायू दलाच्या विमानतळावर दाखल झाल्यानंतर आयोजित कार्यक्रमात त्यांनी नव्या मार्गाचे लोकार्पण केले. गेल्या 17 वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या हैदराबाद-कर्नाटक भागातील जनतेचे स्वप्न आता साकार झाले आहे. 1542 कोटी रुपये खर्चातून ही योजना पूर्ण झाली आहे. या मार्गामूळे बेंगळूर, मुंबईसह अतर शहरांना जाणाऱया प्रवाशांच्या वेळेची बचत होणार आहे. त्यानंतर ते येथील नेहरू मैदानावर आयोजित भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सहभागी झाले.

2022 पर्यंत देश ‘कॅशलेस’

डिजीटल इंडिया, कॅशलेस व्यवहाराचा देशातील जनतेने स्वीकार केला आहे. येत्या 2022 पर्यंत संपूर्ण देश कॅशलेस बनविण्याचे उद्दिष्ट             बाळगले आहे. जगातील अनेक राष्ट्रे आज कॅशलेस आहेत. आपल्याकडे देखील डिजीटल इंडिया आणि कॅशलेस व्यवहाराचा जनता टप्प्याटप्प्याने स्वीकार करीत आहे. त्यामुळे देशाला उज्ज्वल भविष्य आहे, असा विश्वास नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. धर्मस्थळ नजीकच्या उजीरे येथील रत्नवर्मा क्रीडांगणावर धर्मस्थळ ग्रामअभिवृद्धी ट्रस्टतर्फे आयोजित रुपे कार्ड वितरण समारंभात ते बोलत होते.

नोटा निश्चलनीकरणासारखा धाडसी निर्णय घेतल्यानंतर देशातील जनतेने आपल्यावर प्रश्नांची सरबत्ती केली होती. हा निर्णय योग्य आहे का? अशी विचारणा प्रत्येक ठिकाणी होत होती. आपल्या निर्णयामुळे करबुडवे, भ्रष्टांचा बिमोड झाला आहे. या कारणामुळेच सुरुवातीपासूनच ते आपल्याला विरोध करीत आहेत. डिजिटलायझेशनामुळे भ्रष्टाचाराला चाप बसला आहे, असे समर्थन त्यांनी केले.

उजीरे येथील कार्यक्रमात सहभागी होण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी धर्मस्थळ येथे मंजुनाथ स्वामी मंदिराला भेट दिली. याप्रसंगी त्यांच्या समवेत धर्मस्थळचे धर्माधिकारी डॉ. विरेंद्र हेगडे उपस्थित होते.

Related posts: