|Wednesday, November 14, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » सराईत चोरटय़ास अटक; 8 मोटारसायकल जप्त

सराईत चोरटय़ास अटक; 8 मोटारसायकल जप्त 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

   शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, परिसरात दुचाकींचे लॉक तोडून दुचाकींची चोरी करणाऱया चोरटय़ास शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. विनायक प्रकाश सावंत (वय 31, रा. बिरदेव चौक, पेठ वडगांव, ता. हातकणंगले) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून 2 लाख 50 हजार रुपये किमतीच्या 8 दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी दिली.

    याबाबत अधिक माहिती अशी की, मध्यवर्ती बसस्थानक परिसरामध्ये शुक्रवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास सराईत मोटारसायकल चोरटा येणार असल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांना मिळाली होती. यानुसार शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध व गुंडाविरोधी पथकातील कर्मचाऱयांनी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात सापळा रचला. यावेळी परीख पुलानजीक एक संशयित विनानंबरप्लेट दुचाकीवरून येताना दिसला. त्याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्याने आपले नाव विनायक सावंत असल्याचे सांगितले. मात्र, दुचाकीच्या कागदपत्रांबाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याला ताब्यात घेऊन दुचाकीबाबत विचारणा केली असता त्याने 4 महिन्यांपूर्वी सासने ग्राऊंड परिसरातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, शिरोळ परिसरातून मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली. यापैकी 8 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

  शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार, साहाय्यक फौजदार संदीप जाधव, पो.हे.कॉ. बजरंग हेब्बाळकर, नीलेश साळोखे, दिवाकर होवाळे, प्रशांत घोलप, सागर डोंगरे, विशाल चौगले, दिगंबर पाटील, महेश गवळी, विजय इंगळे आदींनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला..

 

Related posts: