|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » उचल जाहीर होत नाही तोपर्यंत ऊसतोड घेऊ नये

उचल जाहीर होत नाही तोपर्यंत ऊसतोड घेऊ नये 

कागल / प्रतिनिधी

   जोपर्यंत साखर कारखाने उचल जाहीर करत नाहीत तोपर्यंत शेतकर्यांनी तोडी घेवू नयेत, असे आवाहन स्वाभिमानी युवा शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सागर कोंडेकर यांनी केले. येथील पालिका कार्यालयासमोर त्यांनी स्वतःचा ट्रक्टर उभा करुन त्या ट्रक्टरवती उभे राहून हे आवाहन केले.

    रविवारी सकाळी येथील पालिका कार्यालयासमोर कोणतेही स्टेज नाही, कार्यकर्ते नसताना त्यांनी आपल्या ट्रक्टरवती उभे राहून आवाहन करण्यास सुरुवात केली. थोडय़ा वेळानंतर शेतकरी व नागरीक यांची मोठी गर्दी झाली.

   वेगळ्या पध्दतीने केलेल्या या आवाहनाची चर्चा शहरात होती. शेतकऱयांना मार्गदर्शन करताना कोंडेकर म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शेतकरी हिताचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या पाठिशी शेतकर्यांनी ठामपणे राहणे गरजेचे आहे. साखर कारखाने पहिली उचल जोपर्यंत जाहीर करीत नाहीत तोपर्यंत उसाच्या तोडी घेवू नयेत. असे आवाहन करत त्यांनी शेतकर्यांना उस दराबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

 यावेळी माजी नगराध्यक्ष अशोक जकाते यांनी कोंडेकर यांच्या ट्रक्टरवती उभे राहून त्यांना पाठिंबा दिल्या. जमलेल्या शेतकर्यांनीही उाल जाहीर होत नाही तोपर्यंत उस तोड घेणार नाही, असे सांगितले.

यावेळी संघटनेचो तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, नामदेव भराडे, पांडूरंग चौगुले,मधुकर वाखले, अविनाश मगूम, श्रीकांत कालेकर, ंरमेश मांडवकर आदी उपस्थित होते.