|Thursday, July 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » ‘त्या’ कामगारांना रोख स्वरुपात वेतन दिल्यास कारवाई

‘त्या’ कामगारांना रोख स्वरुपात वेतन दिल्यास कारवाई 

प्रतिनिधी / बेळगाव

उद्योग खात्री योजनेंतर्गत हाती घेण्यात येणाऱया कामाचा दर्जा चांगला राखण्यात यावा, यासाठी सर्व ग्राम पंचायतींच्या पीडीओ आणि अभियंत्यांनी वारंवार कामाची पाहणी करावी, तसेच  मजुरीची रक्कम संबंधितांच्या बँक खात्यात वेळेवर जमा करावी, कामगारांना रोख स्वरुपात रक्कम दिल्यास संबंधित अधिकाऱयांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामचंद्रन आर. यांनी संबंधित अधिकाऱयांना दिला आहे.

नरेगा योजनेंतर्गत काम करीत असणाऱया कामगारांना निर्धारित वेळेत वेतन न देणाऱया अधिकाऱयांविरुद्धही कारवाई करण्यात येणार असल्याचे रामचंद्रन आर. यांनी सांगितले. नुकत्याच नरेगा योजनेंतर्गत हाती घेण्यात आलेल्या कामाच्या विकास आढावा बैठकीत हा इशारा देण्यात आला. नरेगा अंतर्गत काम करीत असणाऱया कामगारांचे वेतन देण्यास विलंब करणे योग्य नसल्याचेही त्यांनी सांगितले.

ग्रामपंचायतींनी जबाबदारीने काम करावे

 

ग्रामीण भागात विविध कामे उद्योग खात्री योजनेतून हाती घेण्यात आली आहेत. या योजनेंतर्गत अधिकाधिक कामे घेऊन मानव दिन वाढविण्याच्या दृष्टीने कामगारांना निरंतर उद्योग देण्यात यावा, या दिशेने सर्व ग्रामपंचायतींनी जबाबदारीने काम करावे, कोणत्याही कारणासाठी उद्योग नाही, असे म्हणून कामगारांना बेकार फिरण्यास देऊ नका, असे आवाहन जि. पं. सीईओ रामचंद्रन आर. यांनी केले. बैठकीस जि. पं. योजना निर्देशक एम. बी. होसमनी, बसवराज एन., प्रकाश मगदुम यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.   

 

Related posts: