|Friday, October 19, 2018
You are here: Home » Top News » मेदी पूर्ण माहिती न घेताच टीका करतात : पी चिदंबरम

मेदी पूर्ण माहिती न घेताच टीका करतात : पी चिदंबरम 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

पंतप्रधान नरेंद्री मोदी पूर्ण माहिती न घेताच टीका करतात ,असा हल्लाबोल माजी अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिंदबरम यांनी केले आहे. चिदंबरम यांच्या काश्मीरबद्दलच्या विधानावर मोदींनी टकास्त्र सोडले होते. या टीकेला चिदंबरम यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

‘राजकोटमधील एका संवादादरम्यान मी काश्मीर प्रश्नावर भाष्य केले होते. त्यावरील मोदींची प्रतिक्रिया लक्षा घेता, त्यांनी माझे विधान पूर्ण ऐकले नाही हे लक्षात येते, काश्मीरबद्दलच्या प्रश्नावर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला मी दिलेले उत्तर इंडियन एक्सप्रेसमध्ये जसेचे तशे प्रसिद्ध झाले आहे. त्यातील नेमका कोणता शब्द चुकीचा आहे ? मी काय चुकीचे बोललो आहे? पंतप्रधान मोदी कुठलीही माहिती पूर्ण न घेता टीका करतात ते केवळ भूताची कल्पना करून त्यावर हल्ले करतात, असे चिदंबरम यांनी म्हटले आहे.

एनडीए सरकारच्या सर्जिकल स्टाईकला मिळालेले यश सहन झालेले नाही, या मोदींची टीकेलाही चिदंबरम यांनी उत्तर दिले आहे. ‘काँग्रेसने सर्जिकल स्ट्राईकवर टीका केलेली नाही. अशा प्रकारच्या कारवाया याआधीही झाल्या होत्या, इतकेच आम्ही निदर्शनास आणून दिले आणि याला लष्करप्रमुखांनीही दुजोरादिला होता’

 

Related posts: