|Wednesday, November 14, 2018
You are here: Home » उद्योग » अनुत्पादित कर्ज 4 लाख कोटीने वाढणार

अनुत्पादित कर्ज 4 लाख कोटीने वाढणार 

क्रिसिलचा अंदाज : वीज उत्पादन क्षेत्र संकटात

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

साधारण 8 लाख कोटी रुपयांच्या अनुत्पादित कर्जाच्या समस्येशी झुंजणाऱया बँकिंग क्षेत्रातील समस्येत वाढ होण्याचा अंदाज आहे. ऊर्जा क्षेत्रात साधारण 4 लाख कोटी रुपयांच्या अनुत्पादित कर्जात वाढ होईल असे संशोधनात सांगण्यात आले. सध्या देशात 51 हजार मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प बंद आहेत. सध्या देशात 23 हजार मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पांचे बांधकाम सुरू आहे. सध्या या प्रकल्पांचे काम पाहता ते लवकरच सुरू होतील अशी शक्यता कमीच आहे.

क्रिसिल या रिसर्च फर्मच्या मते, गेल्या दोन वर्षांत देशातील कोळशाच्या पुरवठय़ात सुधारणा होत आहे. मात्र यानंतरही खासगी प्रकल्पांना आवश्यक त्या प्रमाणात कोळशाचा पुरवठा करण्यात येत नाही. कोळशाप्रमाणे वायूचे उपलब्धता होत असल्याने प्रकल्पांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. औष्णिक आणि वायूवर चालणारे साधारण 51 हजार मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प बंद आहे. यातील 30 हजार मेगावॅटचे प्रकल्प वीज खरेदी करार आणि इंधनाच्या समस्येमुळे बंद आहेत. 21 हजार मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प हे कायद्यांत बदल करण्यात आल्याने बंद करण्यात आलेत.

वीज वितरण कंपन्यां उत्पादकांबरोबर करार करण्यास तयार नाहीत. गेल्या दोन वर्षांत सौर आणि पवन ऊर्जेच्या दरात घट झाली आहे. गेल्या दोन वर्षांत देशातील कोळशाचे उत्पादन वाढले आहे. मात्र अनेक वर्षे हे प्रकल्प आयात केलेल्या कोळशावर चालत आहेत. या प्रकल्पांमधील तंत्रज्ञान आयातीच्या कोळशासाठी बनविण्यात आले आहेत. आयातीच्या कोळशाच्या किमती वाढत आहेत, त्यामुळे पुरवठा घटत आहे असे तज्ञांचे म्हणणे आहे.

Related posts: