|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » क्रिडा » फेडररचे आठवे विजेतेपद

फेडररचे आठवे विजेतेपद 

वृत्तसंस्था / बेसिल

स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने रविवारी येथे स्विस खुल्या इनडोअर पुरूषांच्या टेनिस स्पर्धेतील आठव्यांदा विजेतेपद पटकाविले. मायदेशातील टेनिस शौकिनांसमोर झालेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात फेडररने अर्जेंटिनाच्या डेल पोट्रोचा 6-7 (5-7), 6-4, 6-3 असा पराभव केला.

या स्पर्धेत 2012 आणि 2013 साली अंतिम सामन्यात अर्जेंटिनाच्या पोट्रोने 36 वर्षीय फेडररला पराभूत केले होते पण यावेळी फेडररने आपल्या सर्व्हिसवर तसेच फोरहँड फटक्यावर नियंत्रण ठेवत आठव्यांदा ही स्पर्धा जिंकली. या विजयामुळे फेडररच्या मानांकनातील गुणामध्ये खूपच फरक झाला आहे. पुरूष टेनिसपटूच्या ताज्या मानांकन यादीत नादाल पहिल्या स्थानावर असून फेडरर दुसऱया स्थानावर आहे. लंडनमध्ये पुढील महिन्यात होणाऱया एटीपी विश्व टूर अंतिम स्पर्धेतील विजेत्याला 1000 एटीपी गुण मिळणार आहेत. नादाल आणि फेडरर यांच्यात 1460 गुणांचा फरक आहे. लंडनमधील होणाऱया स्पर्धेत पात्र ठरण्यासाठी पोट्रोला प्रेंचच्या राजधानीत होणाऱया पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत किमान उपांत्य फेरी गाठावी लागेल.