|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » भरधाव डंपर उलटून कामगार ठार

भरधाव डंपर उलटून कामगार ठार 

प्रतिनिधी/ लांजा

दाभोळे (त़ा संगमेश्वर) येथून कामगार घेऊन राजापूरकडे निघालेल्या भरधाव  डंपरला ब्रेक निकामी होऊन झालेल्या भीषण अपघातात एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला. महामार्गानजीकच्या आंब्याच्या झाडाला जोरदार धडक देऊन डंपर दुरवर फेकला गेल़ा यात 16 कामगार गंभीर जखमी असून विसू लालू पवार (55, ऱा तमदट्टी, त़ा मुद्दबल, ज़ि  विजापूर) यांचा जागीचा मृत्यू झाला. सोमवारी सकाळी 11. 15 च्या सुमारास ही दुर्घटना घडली.

लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संगमेश्वर तालुक्यातील दाभेळे सुकमवाडी येथील एका कंपनीसाठी विजापूचे 17 कामगार काम करत होत.  आले होत़े सोमवारी या कंपनीचे राजापूर तालुक्यातील कोंडय़े येथे काम सुरु होणार असल्याने त्या ठिकाणी या कामगारांना घेऊन कंपनीचा डंपर (एम़ एच़ क्रमांक-08, एच-1962) घेऊन चालक संदीप अनाजी भोगटे (29, ऱा कणकवली) निघाला हेत़ा डंपर दाभोळेहून कोंडय़ेकडे हा अपघात घडला.

हा डंपर लांजा येथील प्रतिक हॉटेल येथे थांबून पुढील प्रवासाला निघाला होता. मुंबई-गोवा महामार्गावर कुवे बागेश्री मंदीराच्या पुढील उतारावर डंपर आला असता चालक संदीप याचा ताबा सुटला. हा डंपर महामार्गाच्या बाजुला असणाऱया आंब्याच्या झाडावर जोरदारपणे धडकल़ा त्यानंतर महामार्गाच्या बाहेर जोरदार फेकला गेल़ा यावेळी डंपरमध्ये बेसावध असलेले कामगार जमीनीवर तर काही कामगार डंपरमध्ये अडकून विव्हळत  हेत़े यामध्ये विसू लालू पवार हा कामगाराचा जागीच मृत्यू झाल़ा तर 16 जण जखमी झाल़े यामध्ये 7 जण गंभीर जखमी झाले आहेत़ या अपघाताची खबर मिळताच लांजा पोलीस स्थानकाचे उपपोलीस निरीक्षक पंडीत पाटील, सहाय्यक उप पोलीस निरीक्षक प्रकाश पांगरीकर, हेड काँस्टेबल सुनील चवेकर, वाहतूक पोलीस संतोष झापडेकर, हेडकॉंस्टेबल सिताराम पंदेरे यांनी घटनास्थळी जाऊन अपघातातील जखमींना तातडीने लांजा रुग्णालयामध्ये दाखल केल़े या अपघाताची माहिती मिळताच शहरातील युवकांनी अपघातस्थळी धाव घेऊन डंपरमध्ये अडकून पडलेल्या 16 जखमींना कामगारांना मिळेल त्या वाहनाने लांजा रुग्णालय आणल़े अपघातातील सर्व जखमींवर लांजा रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचार करुन 108 रुग्णवाहीकेने रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालयामध्ये हलवण्यात आल़े रुग्णांच्या मदतकार्यासाठी लांजा, ओणी, साखरपा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुग्णवाहीका मदतीसाठी धाऊन आल्य़ा

या अपघातात रेणूका रमेश इप्पारगी (40 ऱा मुद्दबल), मिनल सुरेश मुद्यावडर (28), महादेवी रामा इप्पागरी (35), विमण्णा लक्षू इप्पारगी (30, ऱा सिद्दोली), हनुमंत सुहगुहू (30), सुमित्रा परमार वडार (42), ज्योती परशू आसगे (20), परशू गुटप्पा आसगे (25), संजना यलप्पा आसगेकर (22), चन्नप्पा अरगरे (52 ), सुद्देवी संगप्पा केळीकट्टी (45), शांता तिमण्णा मुद्देवडार (24), रेणुका चन्नप्पा अटूर (40), सत्या मुद्दगार (6), रेणू मुद्देगार (5), पर्शुराम महादेवआप्पा तळीकोट्टी (33) व डंपर चालक संदीप अनाजी भोकटे (29, ऱा कणकवली) जखमी झाले आहेत़

भाषेमुळे माहिती मिळण्यात अडथळे

सर्व कामगार परप्रांतीय असल्याने अपघातातील सर्व मजुरांना मराठी बोलता येत नसल्याने त्यांची नावे, पत्ता व अन्य माहिती मिळणे कठिण झाले होत़े कंपनीच्या काही कर्मचाऱयांशी संपर्क साधल्याने जखमी कामगारांबाबत माहीती उशिराने प्राप्त झाली.

 

सुदैवाने शेतकरी बचावले

सध्या भातकापणीचा हंगाम सुरु आह़े अपघातस्थळापासून काहीच फुटावर कुवे येथील महीला व पुरुष शेतकरीवर्ग भात कापणीत दंग हेत़े  भरधाव वेगातील हा डंपर उताराने भात शेतात घुसला असता तर मोठे अरिष्ट ओढवण्याची शक्यता होती.

 

Related posts: