|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » 3 नोव्हेंबर रोजी लष्करप्रमुख बेळगावात

3 नोव्हेंबर रोजी लष्करप्रमुख बेळगावात 

बेळगा / प्रतिनिधी

भारताचे लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत (यू.वाय.एस.एम., ए.व्ही.एस.एम., वाय.एस.एम., एस.एम., व्ही.एस.एम.) हे दि. 3 नोव्हेंबर रोजी बेळगावात येत आहेत. लष्करप्रमुख रावत यांचा हा पहिलाच बेळगाव दौरा आहे.

मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये 3 नोव्हेंबर रोजी राष्ट्रपतींनी बटालियनला बहाल केलेल्या बटालियन ध्वज हस्तांतरणचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला  बिपीन रावत उपस्थित राहणार आहेत. रावत हे मराठा सेंटरचे कर्नल ऑफ द रेजिमेंट लेफ्ट. जनरल पी. जे. एस. पन्नू यांना बटालियन ध्वज हस्तांतरीत करणार आहेत. 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते 12 च्या दरम्यान बेळगावातील तळेकर ड्रील मैदानावर हा कार्यक्रम होणार आहे.

27 वर्षानंतर मराठा रेजिमेंटमध्ये ध्वज हस्तांतरण कार्यक्रम होत आहे. तिरंग्याच्या खालोखाल लष्करमध्ये बटालियनच्या ध्वजाला मान दिला जातो. या ध्वजारोहण कार्यक्रमाची रंगीत तालीम दि. 1 नोव्हेंबर रोजी होणार असून याचे निरीक्षण लेफ्ट. जनरल पी. जे. एस. पन्नू करणार आहेत. मराठा सेंटरचे जनसंपर्क अधिकारी मेजर मधुकर भट्ट यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे.

नाम नमक आणि निशाण हे त्रिसूत्री सैन्यासाठी मोलाची मानली जाते. बटालियनचा ध्वज क्वातर गार्ड येथे दिमाखात फडकत राहणार आहे. तिन्ही सेना दलाचे प्रमुख राष्ट्रपती असतात. राष्ट्रपती तिन्ही दलाच्या लष्कर प्रमुखांना ध्वज बहाल करतात. मग ते प्रमुख संबंधित बटालियन ध्वज हस्तांतरण करत असतात.

Related posts: