|Wednesday, July 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » कुख्यात शार्पशुटर धर्मराज चडचणचा एन्काउंटर

कुख्यात शार्पशुटर धर्मराज चडचणचा एन्काउंटर 

वार्ताहर/ विजापूर

अनेक खून व अपहरणांचा सूत्रधार असलेला कुख्यात शार्पशुटर धर्मराज मल्लिकार्जुन चडचण याचा एन्काउंटर करण्यात आला. इंडी पोलीस स्थानकाचे पीएसआय गोपाळ हळ्ळूर यांनी स्वरक्षणार्थ आठ गोळय़ा झाडून धर्मराजचा एन्काउंटर केला. तर त्याचा साथीदर यामध्ये जखमी झाला आहे. इंडी तालुक्यातील कोंकणगाव येथील माळभागावरील परिसरात सोमवारी सापळा रचून ही करवाई करण्यात आली. धर्मराज याने प्रथम बचावासाठी पिस्तुलातून गोळी झाडल्याने पीएसआय हल्लूर हेही जखमी झाले आहेत. त्यांच्यावर येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

 याविषयी पोलीस अधिकाऱयांकडून मिळालेली माहिती अशी, कुख्यात शार्पशुटर धर्मराज चडचण हा इंडी तालुक्यातील कोंकणगाव येथे लपून बसला असल्याची माहिती खबऱयाकडून पीएसआय गोपाळ हळ्ळूर यांना मिळाली होती. तसेच त्याच्याकडे गावठी पिस्तुले व बंदुकाही असल्याचे समजले होते. यानुसार त्यांनी आपल्या साथीदारांसह सापळा रचला. सोमवारी सकाळी ठरल्याप्रमाणे सर्व फौजफाटय़ासह कोंकणगाव येथे लपून बसलेल्या परिसराला पोलिसांनी घेराव घातला. यावेळी तेथील झोपडीत धर्मराजचे साथीदार शिवानंद बिरादार बाशासाब सापडले. त्यांना अटक करून धर्मराजचा पत्ता विचारण्यात आला. मात्र त्या दोघांनही तोंड उघडले नाही. अखेर पोलिसी खाक्या दाखवताच धर्मराज हा शेतात असल्याचे सांगितले.

अन् धर्मराजवर आठ गोळय़ा झाडल्या

धर्मराज शेतात लपून बसल्याचे समजताच पोलिसांनी चोहोबाजूंनी घेराव घालून धर्मराजला शरण येण्यास सांगितले. यावेळी आपण सापडणार असल्याचे भीतीने धर्मराजने स्वत:कडील पिस्तूलमधून पीएसआय गोपाळ हळ्ळूर यांच्यावर गोळी झाडली. हळ्ळूर यांच्या पायाला गोळी लागल्याने ते जखमी झाले. यानंतर त्यांनी स्वरक्षणार्थ धर्मराजवर आठ गोळय़ा झाडल्या. यामध्ये धर्मराज जागीच कोसळला.

झटापटीत धर्मराजचा साथीदारही जखमी

या झटापटील धर्मराजचा साथीदार शिवानंदलाही गोळी लागून तो जखमी झाला आहे. यानंतर लागलीच पोलिसांनी धर्मराज व शिवानंद याला उपचारासाठी येथील बीएलडीई दवाखान्यात दाखल केले. मात्र पोलिसांनी धर्मराजला मृत घोषित केले. तर जखमी शिवानंद याच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच पीएसआय गोपाळ हळ्ळूर यांनाही उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

पिस्तुले, बंदुका जप्त

पोलिसांनी मोठय़ा फौजफाटय़ासह धर्मराजचा एन्काउंटर केला. यावेळी संपूर्ण परिसरात पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. धर्मराजकडे गावठी पिस्तुले असल्याची माहिती खबऱयाकडून अगोदरच मिळाली होती. यामुळे पोलिसांनी धर्मराज राहत असल्या ठिकाणी पोलिसांनी पाहणी केली असता त्यांना अनेक पुरावे सापडले. यामध्ये पीएसआय यांची एक सर्व्हिस बंदूक, दोन लांब पल्याच्या बंदुका व 5 गावठी पिस्तुले जप्त करण्यात आली.

  या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीसप्रमुख कुलदीप जैन, अतिरिक्त पोलीसप्रमुख शिवकुमार गुणारे, इंडीचे डीएसपी शिरूर, चडचण पोलीस स्थानकाचे सीपीआय आसोडे यांनी घटनास्थळी भेट देऊ पाहणी केली.

आयजीपी सी. रामचंद्रराव यांची भेट

कारवाईत जखमी झालेले पीएसआय गोपाळ हळ्ळूर यांना येथील बीएलडीई हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना समजताच बेळगाव विभागाचे आयजीपी सी. रामचंदराव व बेळगाव जिल्हा पोलीसप्रमुख बी. आर. रवीकांतेगौडा यांनी हॉस्पिटलमध्ये हळ्ळूर यांची भेट घेऊन विचारपूस केली.

Related posts: