|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » सीमाप्रश्न ऑनलाईन महामंथनाला प्रचंड प्रतिसाद

सीमाप्रश्न ऑनलाईन महामंथनाला प्रचंड प्रतिसाद 

प्रतिनिधी/ बेळगावा

‘तरुण भारत’ने सीमाप्रश्नाचा समग्र इतिहास “धगधगत्या सीमाप्रश्नाचे महामंथन’’ या लेखमालेद्वारे वृत्तपत्रातून देण्यास प्रारंभ केला. या माध्यमातून वृत्तपत्राचे वाचन करणाऱया लाखो वाचकांपर्यंत हा इतिहास पोहोचलाच आहे. मात्र या लेखमालेचे व्हिडीओ स्वरुपात रुपांतरण करून ‘तरुण भारत न्यूज’ या यु-टय़ूब चॅनेलच्या माध्यमातून ही मालिका इंटरनेटवर पाठविण्यास सुरुवात केल्यानंतर तिला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. मालिका सुरु झाल्यापासून आजवर तब्बल 5 लाखांहून अधिक मंडळींनी ती पाहिल्याचे दिसून आले आहे.

बेळगाव, कारवार, निपाणीसह सीमाभाग तसेच महाराष्ट्रातील तब्बल 2 ते अडीच लाख जनतेने यु-टय़ूब चॅनेलवरील ही मालिका पाहिली आहे. संपूर्ण देशभरातही ती प्रसिद्ध झाली असून देश-विदेशातील 4 लाख 5 हजार 758 नागरिकांनी हे व्हिडीओ पाहिले आहेत. संयुक्त अरब अमीरात आणि अमेरिकेतील नागरिकही या इतिहासाकडे आपुलकीने पाहताना दिसतात. युएईमधील 3 हजार 463 तर अमेरिकेतील 3 हजार 357 जणांनी हे व्हिडीओ पाहिले आहेत. याचबरोबरीने सौदी अरेबिया, कुवैत, ब्रिटन, ओमान, मलेशिया, कतार, पाकिस्तान, जर्मनी, बांगलादेश, फिलीपाईन्स, मॉरिशस, रशिया, बेल्जियम, स्वित्झर्लंड आदी देशांमध्ये या व्हिडीओंना चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

1956 आणि त्यानंतरच्या सीमाप्रश्नी झालेल्या सत्याग्रह आंदोलनातील सत्याग्रहींच्या मुलाखती

याच व्हिडीओंच्या माध्यमातून यु-टय़ूब चॅनेलवर प्रसारित करण्यात आल्या. त्यांनाही सीमाभागासह महाराष्ट्र आणि देश-विदेशात चांगले क्हय़ूव्ज मिळाले आहेत. बेळगावचा सीमाप्रश्न काय आहे? याची माहिती देशात आणि विदेशात पोहोचावी आणि हा प्रश्न निर्माण केलेल्या राज्यकर्त्यांना त्याची जाण यावी, अशी संकल्पना सीमाभागाचे नेते आणि तरुण भारतचे समूहप्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर यांनी मांडली आहे. या संकल्पनेला उदंड प्रतिसाद मिळाला आहे.

व्हिडीओ सर्वत्र व्हायरल

1 नोव्हेंबरच्या काळय़ा दिनाच्या पार्श्वभूमीवर हे व्हिडीओ ‘तरुण भारत न्यूज’ या यु-टय़ूब चॅनेलच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आले.

तरुण भारतच्या धगधगत्या सीमाप्रश्नाचे महामंथन या मालिकेचे क्लिपींग्स तसेच व्हीडीओमधील भाग घेवून त्यांच्या माध्यमातून तरुणाईला जागे करण्याचा प्रयत्न इंटरनेटच्या माध्यमातून पहायला मिळाला आहे. बघताय काय सामील व्हा, तसेच उठ मराठय़ा जागा हो, सीमा प्रश्नाचा धागा हो या सारखे संदेश जोडून तरुणाईने समग्र सीमाप्रश्नाच्या इतिहासाला सर्वत्र पोहोचविण्याची मोहीमच सुरु केली आहे.

या एकंदर उपक्रमाबद्दल तरुणाईने तरुण भारतचे आभारच मानले आहेत. तरुण भारत डेली या तरुण भारतच्या फेसबुक पेजवर असंख्य लाईक्स आणि शेअर्स पहायला मिळाले आहेत. प्रत्येक व्हिडीओला युवकांनी आपल्या लाईकच्या माध्यमातून प्रतिसाद दिला आहे. तर सीमाप्रश्ना विरोधात गरळ ओकणाऱया विरोधकांच्या प्रतिक्रियांना संख्याबळाच्या माध्यमातुन खाली पाडविले आहे. सोशल मीडीयावर व्यक्त होण्यावर बंधने आलेली असतानाही तरुणाई आणि सीमाप्रश्नाबद्दल आपुलकी असणाऱया मंडळींनी दिलेली दाद या प्रश्नाचे आणि या प्रश्नासाठी धडपडणाऱया तरुण भारतचे बळ वाढविणारेच आहे.

तरुण भारत सीमाभागातील मराठीचा आवाज आहे, सीमाभागातील मराठी माणसाची आई म्हणजेच तरुण भारत, मला तुझा अभिमान आहे. खरचं मराठी माणसांचे मुखपत्र आहे तरुण भारत या प्रकारच्या प्रतिक्रिया ऐकायला वाचायला मिळाल्या आहेत. एका विद्यार्थिनीने तर आपल्याला या संदर्भातील आणखी माहिती हवी आहे, अशी मागणी करत तरुण भारतने चांगला उपक्रम सुरु केला आहे. कन्नड माध्यमातून शिकणाऱया विद्यार्थ्यांना सर्वत्र चांगला मान आणि नोकऱया मिळतात, मराठी विद्यार्थी म्हणून आमच्यावर अन्याय होतात, अशी भावना तिने व्यक्त केली आहे.

काहींनी आपला निनावी अभिप्राय कळविला आहे. आजवर सीमाप्रश्न म्हणजे जास्त काही माहिती नव्हते. मात्र तरुण भारतच्या या मालिकेमुळे आपल्याला सीमाप्रश्न म्हणजे नेमके काय आहे? हे कळू लागले आहे, असे म्हणणे व्यक्त करण्यात आले आहे.

Related posts: