|Tuesday, December 18, 2018
You are here: Home » Top News » 15 डिसेंबरनंतर राज्य खड्डे मुक्त होणार : चंद्रकांत पाटील

15 डिसेंबरनंतर राज्य खड्डे मुक्त होणार : चंद्रकांत पाटील 

ऑनलाईन टीम / नागपूर  :

15 डिसेंबरनंतर राज्यातील रस्त्यांवर एकही खड्डा दिसणार नाही, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. पावसामुळे स्त्यावर खड्डे बुजवण्यासाठी टेंडर काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

कार्तिकी एकादशीनिमित्त सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील सोमवारी संध्याकाळी पंढरपूरमध्ये पोहोचले. महाराष्ट्रात सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत 96 हजार किलोमीटर लांबीचे रस्ते असून या रस्त्यांवर 15डिसेंबरनंतर एकही खड dडा दिसणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. पाटील यांनी यापूर्वीही रस्त्यावर खड्डे नसतील ,असा दावा केला होता. मात्र यानंतरही राज्यातील रस्त्यांची परिस्थिती सुधारली नाही. त्यामुळे आता तरी चंद्रकांत पाटील दिलेला शब्द पाळणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. सार्वजीनक बांधकाम विभागाचे बहुतांश रस्ते हे रोजगार हमी योजनेअंतर्गत तयार केल्याने त्यांचा दर्जा चांगला नाही, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता 15 डिसेंबरनंतर राज्य खड्डे मुक्त होणार का ? याकडे सगळयांचे लक्ष लागून आहे.

 

Related posts: