|Tuesday, December 18, 2018
You are here: Home » Top News » भारतीय सैन्य बांधणार एल्फिन्स्टनचा पूल

भारतीय सैन्य बांधणार एल्फिन्स्टनचा पूल 

ऑनलाईन टीम / मुंबई :

एलिपन्स्टन पुलावरील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला होता. फुटओव्हर स्थानकांवरील अरूंद ब्रीजमुळे गैरसोय होत असल्याची तक्रार अनेक प्रवाशांनी केली होती. दरम्यान, एल्फिन्स्टन स्थानकावरील फूटओव्हर ब्रीज भारतीय सैन्यांकडून बांधला जाणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज एल्फिन्स्टन स्थानकाची पहाणी केली. यावेळी ही घोषणा करण्यात आली.

5 नोव्हेंबरपासून भारतीय सैन्य फूटओव्हर ब्रीजच्या बांधकामाला सुरूवात करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. भारतीय सैन्यातील इंजिनीअरिंग विंग आपत्कालीन परिस्थितीत अशाप्रकारे ब्रीज बांधते. कमीत कमी वेळात सैन्याकडून हा ब्ा्राrज बांधला जाईल. रेल्वे प्रशासनाने पुलाची जागा निश्चित केल्यानंतर , लष्कराचे अभियंते पुलाचा आराखडा तयार करून देतील आणि पुढे प्रत्यक्ष बांधकामातही सर्वतोपरी सहकार्य करतील. भारतीय लष्कराच्या क्षमतेवर कुणालाच शंका नाही. त्यामुळे रेल्वे पुलाच्या कामात त्यांचा झालेला सहभाग हा मुंबईकरांसाठी निश्चित दिलासादायक आहे.

 

Related posts: