|Thursday, January 17, 2019
You are here: Home » Top News » राणेंसारखे ‘त्यागी’ सत्तेत आणि आम्ही सत्तेबाहेर : एकनाथ खडसे

राणेंसारखे ‘त्यागी’ सत्तेत आणि आम्ही सत्तेबाहेर : एकनाथ खडसे 

ऑनलाईन टीम / धुळे  :

पक्षवाढीसाठी ज्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले आणि सत्ता आणली ते सत्तेबाहेर आहेत आणि नारायण राणेंसारख्या ‘त्यागी’नेत्यांना सत्तेत घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. ,अशा शब्दांत माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपवर नाराजी व्यक्त केली आहे.

धुळे जिह्यात ‘आणीबाणी चिंता आणि चिंतनाचा विषय’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी एकनाथ खडसेंसोबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष श्याम जाजू हेही उपस्थित होते. पक्षाबाहेर ठेवल्याची आपल्या मनातील खंत एकनाथ खडसे यांनी श्याम जाजू यांच्यासमोर मांडली. सध्याच्या तरूण पिढीला हा इतिहासात माहित नसून सध्याच्या अनेक आमदार आणि खासदारांनाही याची माहिती नाही, असे त्यांनी सांगितले. यासाठी आमदार – खासदारांचे विशेष वर्ग घ्यावा लागतील, असे त्यांनी म्हटले आहे. आणीबाणीत संघर्ष करणारे सत्तेबाहेर आणि नारायण राणेंसारख्या त्यागी नेत्यांना सत्तेत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे असेच सुरू राहिले तर जुन्या माणसांना न्याय कसा मिळणार असा प्रश्न त्यांनी विचारला.

 

Related posts: