|Sunday, June 16, 2019
You are here: Home » Top News » चीनमध्ये राष्ट्रगीताचा अपमान करणाऱयांना तीन वर्षांची शिक्षा

चीनमध्ये राष्ट्रगीताचा अपमान करणाऱयांना तीन वर्षांची शिक्षा 

ऑनलाईन टीम / बीजिंग :

भारतात सध्या राष्ट्रगीतासाठी उभे रहायचे की नाही यावरून वाद-विवाद सुरू असताना चीनमध्ये मात्र राष्ट्रगीताचा अपमान करणाऱयांवर तीन वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता आहे. असे वृत्त स्थानिक वृत्तवाहिनी शिन्हुआने दिले आहे.

सप्टेंबर महिन्यात चीनने आपले राष्ट्रगीत ‘मार्च ऑफ द वॉलिंटिअर्स’चा अपमान करणाऱयांना 15 दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्यासंबंधीचा कायदा संमत केला होता. हा कायदा चीनव्याप्त हाँगकाँग आणि मकाऊलाही लागू होता.संसदेने यानंतर राष्ट्रगीताचा अपमान करणाऱयांसाठी गुन्हेगारी कायद्यात काही बदल करून फौजदारी खटला दाखल करू शकतो यावर विचार केला. सोमवारी सुरू झालेल्या संसदेच्या समितीच्या द्वि-मासिक सत्रात कायद्याचा मसुदा मांडण्यात आला. उल्लंघन करणाऱयांना तीन वर्षांच्या कारावसाची शिक्षा करण्यासंबंधी मसुद्यात उल्लेख आहे. पण या कायद्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही.