|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » रिलायन्सकडून दररोज मिळणार 3GB डाटा, अनलिमिटेड कॉलिंग

रिलायन्सकडून दररोज मिळणार 3GB डाटा, अनलिमिटेड कॉलिंग 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

भारतातील प्रसिद्ध मोबाईल नेटवर्क कंपनी रिलायन्सने खास आपल्या ग्राहकांसाठी आपला नवा 4 जी डाटा प्लॅन लाँच केला आहे. हा प्लॅन 799 रुपयांत लाँच करण्यात आला असून, या प्लॅनअंतर्गत युजर्सला दररोज 3 जीबी डाटासह अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे.

रिलायन्स जिओकडून 19 रुपये, 309 रुपयांच्या प्लॅनसह इतर विविध प्लॅनस् बंद करण्यात आले होते. त्यानंतर या प्लॅनची मागणी वाढली होती. युजर्सच्या प्रचंड मागणीनुसार हे सर्व प्लॅनस् पुन्हा सुरु केले जाणार आहेत. याशिवाय कंपनीने आता 799 रुपयांत प्लॅन लाँच केला आहे. रिलायन्स जिओच्या या प्लॅननुसार युजर्सला दररोज 3 जीबी डाटा आणि अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ घेता येणार आहे. या प्लॅनची वैधता 90 दिवसांसाठी असणार आहे.

– प्लॅन 309 रुपयांचा –

– कंपनीने 309 रुपयांचा हा प्लॅन यापूर्वी बंद केला होता. मात्र, युजर्सच्या वाढत्या मागणीमुळे हा प्लॅन पुन्हा सुरु करण्यात आला आहे. या प्लॅनबाबत साइटवर माहिती देण्यात आली आहे. या प्लॅनची वैधता 49 दिवसांची असून, युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देण्यात येणार आहे.

Related posts: