|Thursday, April 18, 2019
You are here: Home » क्रिडा » विंडीजला पहिल्या डावात आघाडी

विंडीजला पहिल्या डावात आघाडी 

वृत्तसंस्था / बुलावायो

येथे सुरू असलेल्या दुसऱया आणि शेवटच्या कसोटीत विंडीज संघाने शेवटची बातमी हाती आली त्यावेळी पहिल्या डावात 7 बाद 328 धावा जमवित यजमान झिंबाब्वेवर नाममात्र आघाडी घेतली आहे. तत्पूर्वी झिंबाब्वेचा पहिला डाव 326 धावांत आटोपला.

दोन सामन्यांच्या या कसोटी मालिकेत विंडीजने पहिली कसोटी जिंकून आघाडी घेतली आहे. या दुसऱया कसोटीत झिंबाब्वेने पहिल्या डावात 326 धावा जमविल्या. सलामीच्या मासाकेझाने 240 चेंडूत 2 षटकार आणि 16 चौकारांसह 147, मूरने 155 चेंडूत 3 चौकारांसह 52 आणि सिकंदर रझाने 147 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 80 धावा जमविल्या. विंडीजतर्फे रॉचने 3 तर गॅब्रियल आणि बिशू यांनी प्रत्येकी दोन तसेच चेस आणि ब्ा्रsथवेट यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

विंडीजने आपल्या पहिल्या डावाला सावध सुरूवात केली. 1 बाद 78 या धावसंख्येवरून विंडीजने मंगळवारी तिसऱया दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. सलामीचा क्रेग बेथवेट आणि केरॉन पॉवेल या जोडीने 76 धावांची भागिदारी केली. ब्रेथवेटने 2 चौकारांसह 32 धावा जमविल्या. पॉवेल आणि बिशू यांनी दुसऱया गडय़ासाठी 55 धावांची भर घातली. सिकंदर रझाने बिशूला झेलबाद केले. त्याने 1 चौकारांसह 23 धावा जमविल्या. सिकंदर रझाने विंडीजला आणखी एक धक्का देताना काईल होपला त्याने केवळ एका धावेवर पायचीत केले. केरॉन पॉवेल पोफूच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याचे शतक 10 धावांनी हुकले. पॉवेलने 230 चेंडूत 7 चौकारांसह 90 धावा जमविल्या. सिकंदर रझाने होप आणि चेस यांनाही बाद करून विंडीजवर अधिकच दडपण आणले. शाय होपने 5 चौकारांसह 40 धावा केल्या. आर. चेसने 45 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 32 धावांचे योगदान दिले. ब्लॅकवूडने 5 धावा जमविल्या. सिकंदर रझाचा तो पाचवा बळी ठरला. विंडीजची यावेळी स्थिती 7 बाद 230 अशी होती. त्यानंतर डॉवरिच आणि कर्णधार होल्डर या जोडीने चिवट फलंदाजी करत आठव्या गडय़ासाठी अभेद्य 98 धावांची भागिदारी करून आपल्या संघाला नाममात्र दोन धावांची आघाडी मिळवून दिली. डॉवरिच 8 चौकारांसह 54 तर कर्णधार होल्डर 5 चौकारांसह 47 धावांवर खेळत होते. झिंबाब्वेतर्फे सिकंदर रझाने 62 धावांत 5 तर पोफू आणि क्रेमर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक

झिंबाब्वे प. डाव 109 षटकांत सर्वबाद 326 (एच. मासाकेझा 147, सिकंदर रझा 80, मूर 52, रॉच 3/44, गॅब्रियल 2/64, बिशू 2/82), विंडीज प. डाव- 133.4 षटकांत 7 बाद 328 (के. ब्ा्रsथवेट 32, पॉवेल 90, बिशू 23, एस हॉप 40, आर. रेस 32, डॉवरिच खेळत 54, होल्डर खेळत आहे 47, सिकंदर रझा 5/62).

(धावफलक अपूर्ण)

Related posts: