|Tuesday, October 16, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » नॅक कमिटीकडून विलिंग्डनला ‘ए’ ग्रेड

नॅक कमिटीकडून विलिंग्डनला ‘ए’ ग्रेड 

प्रतिनिधी/ सांगली

शतकपुर्तीकडे वाटचाल करत असलेल्या येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या विलिंग्डन महाविद्यालयास नॅशनल असेसमेंट अँड ऍक्रिडिटेशन कौन्सिल (नॅक), बेंगलोर या राष्ट्रीय संस्थेकडून ‘ए’ ग्रेड प्रदान करण्यात आली.

पश्चिम बंगाल येथील बरव्दान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शोरोसीमोहन दान, तामिळनाडूचे डॉ. एन. चंद्रशेखरन व उत्तर प्रदेशचे डॉ. जे. पी. एन. व्दिवेदी यांच्या समितीने विलिंग्डन महाविद्यालयास भेट दिली. या समितीने महाविद्यालयातील विविध विभाग, अध्ययन- अध्यापन, संशोधन कार्य, कला-क्रिडा क्षेत्रातील कामगिरी यांची पाहणी तसेच आजी-माजी विद्यार्थी, पालक यांच्याशी समक्ष चर्चा केली. महाविद्यालयाची सुरु असलेली प्रगतशील वाटचाल पाहून या कमिटीने या महाविद्यालयास ‘ए’ ग्रेड पदवी दिली.

महाविद्यालयातील कर्मचाऱयांना डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष शरदराव कुंटे, उपाध्यक्ष विकास काकतकर, वरिष्ठ महाविद्यालय समन्वय समितीचे अध्यक्ष किरण शाळिग्राम, महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख किशोर पंडीत, कौन्सिल सदस्य सागर फडके, सर्व आजीव सदस्य मंडळ, फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. परदेशी, बृहन महाराष्ट्र कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. रावळ यांचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयाच्या उज्ज्वल यशाबद्दल प्राचार्य डॉ. भास्कर ताम्हणकर व नॅक स्टीअरींग कमिटीचे प्रमुख प्रा. आखलाक ताडे यांचे अभिनंदन होत आहे.

Related posts: