|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » 2019 ला राजू शेट्टींची विजयाची हैट्रीक निश्चित : विकासराव देशमुख

2019 ला राजू शेट्टींची विजयाची हैट्रीक निश्चित : विकासराव देशमुख 

वार्ताहर/ कोकरूड

  ज्यांना स्वताच्या प्रभागात भाजपाच्या कार्याक्रत्याला तिकीट मिळवून देता आले नाही. आणि स्वता ज्यांना इचलकरंजी नगरपालिका निवडणुकीत नवख्या उमेदवाराकडून धोबीपछाड मिळाली, त्या हिंदुराव शेळकेंनी राजू शेट्टींच्या खासदारकीचे भाकीत करू नये. 2019 ची लोकसभा विक्रमी मतांनी जिंकून शेट्टी  साहेब विजयाची हैट्रीक साधणारच असा ठाम विश्वास शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष विकासराव देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

  ते म्हणाले 2009 व 2014 या दोन्ही निवडणुकीत राजू शेट्टी लाखो मतांच्या फरकाने जिंकले आहेत. त्यांच्या पहिल्या विजयाची व “एक मत – एक नोट’’ ची दखल परकीय न्यूज चानेल्स व वर्तमानपत्रांनी घेतली आहे. आज शेतकर्यांच्या उसाला तीन हजार रु. च्या आतबाहेर मिळणारा दर हर फक्त राजू शेट्टींच्या शेतकरी संघटनेच्या लढय़ाचे यश आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीची त्यांना काही चिंता नाही. हि निवडणूक शेतकरीच लढवतील. भाजपने अत्तापासूनच  उमेदवाराच्या शोधात ताकद लावावी. उगाच काहीतरी बाष्कळ बोलून लोकांची करमणूक करू नये. सध्याचे सरकार स्वभिमानी शेतकरी संघटनेच्या जीवावर निवडून आले आहे. त्यामुळे येणाया लोकसभेत हे सरकार आपटी खाणार यात काही तिळमात्र शंखा नाही.

  आज देशात अस्वस्धता आहे. जातीयवाद फोफावतो आहे. कर्जमाफी करण्यात हे सरकार सफसेल आफयशी ठरत आहे. विकास वेढा झाला आहे, अशी सर्वत्र चर्चा आहे. भाजपचे जहाज बुडण्यास प्रारंभ झाला आहे. कोल्हापूर भाजपचे अध्यक्ष हिंदुराव शेळकेंच्या आर्थिक भानगडी लोकांच्या लक्षात येऊ लागल्या आहेत. यंत्रमाग महामंडळाला बुडवू पाहणाया शेळकेंना राजू शेट्टींच्या निवडणुकीची चिंता करण्याची काही गरज नाही. छोटे यंत्रमाग धारक व जेष्ठ यंत्रमाग कार्मचारी यांना देशोधडीला लावण्याचे यांचे प्रताप जनता पाहत आहे. भाजपाला आज सूज आली आहे. आयाराम-गयाराम संस्कृती भाजपामुळे फोफावली आहे. 2014 पूर्वी भाजप या मतदार संघात दुर्बिणीतून शोधावा लागत होता. येणाया लोकसभा निवडणुकीत त्यांना पुन्हा दुर्बिनितुनच शोधावे लागणार आहे. त्यांनी दुस्रयाच्या अस्तित्वाची चिंता करण्यापेक्षा, राजू शेट्टी विरोधात कोण उमेदवार उभा राहील याचा शोध घ्यावा. ज्योतिषपण बघण्यात वेळ न घालवता त्यांनी उमेदवार शोधण्यात वेळ खर्च करावा.

चौकट :- इचलकरंजी हा राजू शेट्टींचा अभेद्य किल्ला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शेट्टींचा विजय हा काळ्या दगडावरील पांढरी रेष असून, ही हैट्रीक कोणी रोखू शकणार नाही. भाजपाचा उमेदवार हा नावालाच उरणार आहे. “गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाल्ली’’ अशी त्यांची गत होणार आहे…विकासराव देशमुख, अध्यक्ष सांगली स्वा.शे. संघटना.

Related posts: