|Wednesday, December 12, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मऱहाटमोळ्या गाण्यांनी इस्लामपुरकर मंत्रमुग्ध

मऱहाटमोळ्या गाण्यांनी इस्लामपुरकर मंत्रमुग्ध 

प्रतिनिधी/ इस्लामपूर

‘लिटल चॅम्पस’ फेम रोहित राऊत, सुरेश वाडकरांची शिष्या मधूरा परांजपे, ‘सुर गृहिणींचे’ विजेती धनश्री देशपांडे, मराठी सारेगम व ‘इंडियन आयडॉल’ फेम प्रसन्नजित कोसंबी, स्वप्नील गोडबोले या युवा गायक-गायिकांनी मऱहाटमोळ्या गाण्यांची उधळण करीत इस्लामपूरसह वाळवा तालुक्यातील कलारसिकांनी मंत्रमुग्ध केले. आविष्कार कल्चरल गुपने ‘रंग सुरांचे’ या ताल, स्वर व नृत्याविष्कारमय कार्यक्रमाचे आयोजन केले होते. येथील विद्यामंदीर हायस्कुलच्या प्रांगणात हजारो कलारसिकांच्या उपस्थितीत मोठया उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला. 

यावेळी आविष्कारच्या रंगमंचांवर राज्य व देशातील आघाडीच्या कलाकारांनी आपली कला सादर केली. तितक्याच ताकदीने या युवा गायकांनी ‘रंग सुरांचे’ सादर करुन रसिकांची मोठी वाहवा मिळविली. रोहित्य राऊत कळता तुला, मधूराबरोबर मला वेड लागले प्रेमाचे, जागो मोहन प्यारे, पिंजरा बनाया सोनेका, पोरी जरा जपून दांडा धरं, मधूरा परांजपेने वेड लावे जिवा, धनश्रींने येवू कशी प्रिया, आयुष्य हे, चांदणं झाली रातं, ही पोळी तुपातली, रक्षावाला आदी गाणी सादर करुन रसिकांना मंत्रमुग्ध केले. स्वप्नील गोडबोलेंनी ‘राधा ही बावरी’ हे गाणे रसिकांच्या साथीने सादर केले. प्रसन्नजितने आपल्या खणखणीत आवाजात अजय-अतुलचे मल्हारं वारी, करुया फुल टू धिंगाण, गं साजणी, खंडेरायाच्या लग्नाला, नवरी नटली आदी मऱहाटमोळ गाणी सादर करुन कार्यक्रमांची रंगत वाढविली. आजची आघाडीची नृत्यांगण नम्रता गायकवाडने अप्पसरा आली. ढोलकीच्या तालावर, मला लागली कुणाची उचकी आदी अनेक लावण्यांवर नृत्याची अदाकारी पेश करुन रसिकांना घायाळ केले. सर्व कलाकारांनी कजरा रे, दमा दमनंतर झिंग झिंगाटच्या जोरदार परफॉर्म्सने कार्यक्रमाचा समारोप केला. कार्यक्रमाचे विशेष म्हणजे शिगांवच्या अक्षय गोसावीने खेळ मांडियेला हे गाणे सादर करुन रसिकांची माने जिंकली.

माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांचे चिरंजीव प्रतिकदादा पाटील यांच्या हस्ते कलाकारांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे नूतन तालुकाध्यक्ष संग्रामसिंह पाटील यांची निवड व वाढदिवसाच्या निमित्ताने सत्कार करण्यात आला. प्रारंभी उद्योगपती दिनकर पाटील ओझर्डेच्या लोकनियुक्त सरपंच मंगलताई पाटील या उभयतांच्या हस्ते लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. ऍड.बी.एस.पाटील, स्मिता अनंत चितळे, बी.डी.पवार, झिंजाड, विराज शिंदे, अजय चव्हाण, प्रा.वसंत हंकारे, संजय बनसोडे, धनाजी पाटील, प्राचार्य दिपा देशपांडे,  सुस्मिता जाधव, एस.डी.कोरडे, विकास कर्डिले, तसेच ‘आविष्कार परिवारा’तील सहा हजारपेक्षो जास्त सदस्यांनी सहकुंटुब कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला.

मोहनराव चव्हाण, अध्यक्ष सुधीर पाटील, सचिव राजेंद्र घोरपडे, उपाध्यक्ष राजवर्धन लाड, नजीर शेख, प्रा.कृष्णा मंडले, सतिश पाटील, बालाजी पाटील, विकास कोरे, सुनिल चव्हाण, लव्हाजी देसाई, राजेंद्र माळी, प्रसाद कुलकर्णी, अजय थोरात, विजय लाड, प्रताप सरनोबत यांच्यासह अविष्कारच्या सर्वच कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

शिगांवच्या अक्षयने रसिकांची मने जिंकली !

शिगांवच्या अक्षय गोसावीने कसलेल्या कलाकारासारखे ‘खेळ मांडियेला’ हे गाणे सादर करुन कलारसिकांची मने जिंकली. माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी जत येथील स्पर्धेत अक्षयला गाणे सादर करताना ऐकले होते. त्यावेळी त्यांनी अक्षयला जवळ बोलावून कौतूक केलेच, शिवाय शिगांवात गेल्यानंतरही कार्यकर्त्यांकडे त्याचा विषय काढला. तसेच त्यांनी आविष्कारच्या पदाधिकाऱयांना त्यास इस्लामपूरच्या कार्यक्रमात गाणे सादर करण्याची संधी देण्याची सूचना केल्या.. अक्षयने जोरदार गाणे सादर करुन आ.पाटील व आविष्कार गुप बदल कृतज्ञता व्यक्त केली.

Related posts: