|Friday, January 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पणजीत साकारणार आता आकर्षक केबल स्टेड पदपूल

पणजीत साकारणार आता आकर्षक केबल स्टेड पदपूल 

प्रतिनिधी/ पणजी

बेती ते पणजी या दरम्यान मांडवी नदीवर आता नवा केबल स्टेड पदपूल उभारला जाणार असून या 800 मीटर्स लांबीच्या पुलावरुन चालत जाता येईल. त्याच बरोबर सायकल व दुचाकी वाहन चालकांनाही त्यावरुन ये जा करता येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली.

इंग्लंडच्या धर्तिवर या पदपुलाची गोव्यात प्रथमच उभारणी होणार आहे. सा. बां. मंत्री सुदिन ढवळीकर यांनी या संदर्भातील प्रस्ताव राज्य सरकारकडे दिलेला आहे.

पुलावर चढण्या-उतरण्यासाठी लिफ्ट

या नियोजित पुलावर सुमारे 50 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा पदपूल  पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरणार आहे. पुलाकरीता मांडवी नदीत दोन खांब उभारवे लागतील. त्यासाठी थोडा खर्च येईल. परंतु या पुलाच्या दोन्ही बाजूच्या टोकांना लिफ्ट बसविल्या जातील. जेणेकरुन या पुलावरुन प्रवास करणाऱयांना लिफ्टने पुलावर जाता येईल. तेथून दुसऱया बाजूने उतरतानाही लिफ्ट बसविली जाणार आहे.

सुरुवातीला या पुलाचा वापर चालण्यासाठी आणि नंतर दुचाकी वाहनांसाठी एक बाजू ठेवण्यात येईल. या पुलामुळे पणजी बसस्थानकावर सकाळी व सायंकाळी होणारी गर्दी थोडी कमी होईल. पणजी आणि बेती वेरे परिसरातील जनतेबरोबरच पर्यटकांसाठी देखील खास आकर्षण ठरणार आहे, असे मंत्री सुदीन ढवळीकर यांनी सांगितले.

Related posts: