|Saturday, January 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » आंबोली धबधब्यासमोरील संरक्षक कठडा कोसळला

आंबोली धबधब्यासमोरील संरक्षक कठडा कोसळला 

वार्ताहर/ आंबोली

आंबोली घाटातील मुख्य धबधब्याजवळ वळणावरच संरक्षक कठडा कोसळल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. आंबोली घाटातील मुख्य धबधब्याजवळील मोरीच्या बाजूलाच संरक्षक कठडा कोसळल्याने अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या मार्गाने वाहनांची रहदारी असते. वळणावरच संरक्षक कठडा नसल्याने रात्रीच्या वेळी येणाऱया वाहनांना अंदाज न आल्याने अपघाताची शक्यता आहे. या मार्गावर डाव्या बाजूला वनविभागाची हद्द असून दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग संरक्षक कठडे दुरुस्तीचे काम करते. हद्द कोणाचीही असली, तरी वाहन चालकांच्या सोईसाठी या वळणावर संरक्षक कठडा बांधणे गरजेचे आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

Related posts: