|Saturday, January 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » सत्ता नसतानाही विरोधकांचा गौरव करण्याचे गरजेचे

सत्ता नसतानाही विरोधकांचा गौरव करण्याचे गरजेचे 

प्रतिनिधी/   संकेश्वर

 अधिकार व सत्ता असतानाही विरोधकांचा गौरव करणे ही मोलाची बाब आहे. कारण इंदिरा गांधी यांनी राजकारणात विरोधकांचा गौरव केला होता. त्यांच्याशी वेळोवेळी सल्ला मसलत करत होत्या, असे प्रतिपादन हुक्केरी गुरुशांतेश्वर हिरेमठाचे चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी यांनी केले. आद्य निजलिंगेश्वर शिक्षण संस्थेच्या डीएडू फॉर्मसी कॉलेज येथे आयोजित दिवंगत इंदिरा गांधी व संजय पाटील यांच्या पुण्यतिथी समारंभात ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून घोडावत विद्यापीठाचे रजिस्टार डॉ. बी. एम. हर्डीकर उपस्थित होते.

इंदिरा गांधी यांनी समाजकार्यात स्वतःला झोकून देत केलेले काम प्रेरणादायी आहे. तर मल्हारगौडांनी राजकीय पटलावर प्रेमाने सर्वांना जिंकून घेतले आहे. अशी मंडळी आता कमी प्रमाणात आढळून येतात असे त्यांनी सांगितले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी घोडावत विद्यापीठाचे रजिस्टार डॉ. बी. एम. हर्डीकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात गोपाळ जिनगौडा, विठ्ठल हेगडे, सुधाकर शानभाग, रामण्णा शेरेगार, शेवंतीलाल शहा, विजय सालीयान, अतुल पुरोहित, महिंद्र देशपांडे, कार्लेकर, विजय शेट्टी, अभय हरदी, रशीद मुजावर, राजू दोडण्णावर यांच्यासह मान्यवरांना गौरविण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष प्रकाश कणगली, बसवराज बागलकोटी, सोमशेखर कणगली, अप्पू तंबद, सुनील पर्वतराव, पवन पाटील, राजेंद्र पाटील, सिद्धू पट्टणशेट्टी, कुनाल पाटील, डॉ. गिरीश कुलकर्णी, भावीमनी यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

निपाणीत आदरांजली

निपाणी : देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांना स्मृतीदिनी आदरांजली वाहण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. हा कार्यक्रम निपाणी काँग्रेस समिती व निपाणी ब्लॉक काँग्रेस समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. यावेळी चिकोडी जिल्हा काँग्रेस समिती अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांनी, दिवंगत इंदिरा गांधी यांनी गरिबी हटाओचा नारा दिला. तसेच देशाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले. त्यांची काम करण्याची पद्धत वेगळी होती त्याचा अभ्यास आजच्या युवापिढीने करण्याची गरज आहे असे त्यांनी सांगितले. यावेळी गोपाळ नाईक, मोहन बुडके, शौलेजा चडचाळे, राजेश कदम, बसवराज पाटील, बबन चौगुले, अरुण आवळेकर, सुनील काकडे, राणी पटेल, दीपक ढणाल, शौकत मणेर यांच्यासह कार्यकर्त्ते उपस्थित होते.

Related posts: