|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » जिल्हाधिकाऱयांनी घेतली अधिकाऱयांची बैठक

जिल्हाधिकाऱयांनी घेतली अधिकाऱयांची बैठक 

हिवाळी अधिवेशन, मुख्यमंत्री दौऱयाच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱयांना सूचना

प्रतिनिधी / बेळगाव

हिवाळी अधिवेशन आणि मुख्यमंत्र्यांचा बेळगाव दौरा या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी झियाउल्ला एस. यांनी अधिकाऱयांची बैठक घेऊन आपापल्या विभागाचा संपूर्ण अहवाल व आराखडा तयार करण्याची सूचना केली. मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात तब्बल 2 तासांहून अधिक वेळ अधिकाऱयांची बैठक घेतली. त्यामध्ये त्यांनी विविध सूचना केल्या.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे बेळगाव जिल्हय़ाच्या दौऱयावर 8 नोव्हेंबरच्या दरम्यान येण्याची शक्मयता आहे. ते अधिकाऱयांची बैठक घेणार असल्याचेही समजते. त्यामुळे संपूर्ण अहवाल प्रत्येकाने तयार ठेवावा, असे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले. पिकांची नुकसानभरपाई, विविध योजनांमध्ये देण्यात आलेल्या लाभार्थ्यांची यादी, पुढील विकासाबाबतचा आराखडा तयार ठेवावा, असेही बजावण्यात आले.

काही अधिकाऱयांनी अजूनही काही कामे प्रलंबित ठेवली आहेत. त्यामुळे त्यांना  धारेवर धरण्यात आले. तातडीने ही सर्व कामे पूर्ण करा, कोणतेही काम प्रलंबित ठेवू नका, अशी सक्मत ताकीद देण्यात आली.  बैठकीला जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. रामचंद्रन, महापालिका आयुक्त शशीधर कुरेर, अप्पर जिल्हाधिकारी सुरेश इटनाळ यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.  

Related posts: