|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » आरटीओ राज्योत्सवाच्या तयारीत, वाहनचालक वाऱयावर

आरटीओ राज्योत्सवाच्या तयारीत, वाहनचालक वाऱयावर 

बेळगाव / प्रतिनिधी

ऑटोनगर येथील आरटीओ कार्यालयाकडे वाहन परवाना, वाहन चालक परवाना घेण्यासाठी मंगळवारी नेहमीप्रमाणे गर्दी उसळली होती. पण राज्योत्सव दिन साजरा करण्यासाठी शहरात येणाऱया वाहनांना अडवून त्यांच्यावर दडपशाही करण्यात आरटीओ अधिकारी गुंतले होते. ऑटोनगरकडे ते अधिकारी फिरकलेच नाहीत. त्यामुळे वाहनचालकांना दिवसभर ताटकळत थांबावे लागले. यामुळे वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागला. कामासाठी आलेल्या साऱयांनीच एकच गोंधळ घातल्याने त्या सर्वांना अखेर मुख्य कार्यालयाकडे पाठवून देण्यात आले.

 राज्योत्सव दिनाच्या मिरवणुकीसाठी आरटीओ अधिकारी ट्रक व इतर वाहने  अडवून त्यांना राज्योत्सव दिनाच्या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी दडपशाही सुरू केली आहे. वाहने अडविण्याच्या नादात परवाना मिळविण्यासाठी आलेल्या वाहनचालकांकडे या अधिकाऱयांनी पाठ फिरविली. सुमारे 200 हून अधिक वाहनचालक ऑटोनगर येथे दिवसभर ताटकळत उभे होते. या वाहनचालकांना कोणतीही सूचना दिली गेली नसल्याने त्यांच्यामधून तीव्र नाराजी व्यक्त होत होती.

 मंगळवारी नेहमीप्रमाणे वाहन चालक ऑटोनगर येथील आरटीओ कार्यालयात वाहन परवाना काढण्यासाठी गेले होते. परंतु सकाळपासून दुपारपर्यंत कोणताच अधिकारी येथे फिरकला नाही. शेवटी काही नागरिकांनी आरटीओ मुख्य कार्यालयात फोन करून माहिती विचारली असता तुम्ही मुख्य कार्यालयात या अशी सूचना त्यांना करण्यात आली. त्यामुळे हे वाहनचालक मुख्य कार्यालयात आले. आरटीओ अधिकारी राज्योत्सवाच्या पूर्व तयारीत गुंतले असल्याने आज वाहन परवाने येथेच काढले जातील, असे सांगण्यात आले.

यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी अधिकाऱयांना जाब विचारला. आरटीओ येणार नसतील तर तशी सूचना देणे गरजेचे होते.  परंतु राज्योत्सवासाठी अशाप्रकारे नागरिकांना वेठीस धरणे कितपत योग्य आहे. असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

Related posts: