|Tuesday, October 16, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मूल्यांकन परीक्षेतही कानडीचाच वरवंटा

मूल्यांकन परीक्षेतही कानडीचाच वरवंटा 

विद्यार्थ्यांना कन्नडमधून सूचनांचा भडिमार

बेळगाव / प्रतिनिधी

शिक्षण खात्यातर्फे घेण्यात आलेल्या मूल्यांकन परीक्षेत विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा कानडीकरणाच्या बडग्याला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे शिक्षणखात्याच्या कानडी कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे.

इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना हाती देण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावापासून सर्व तपशील लिहिण्याची सूचना कन्नडमधून करण्यात आली होती. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना या सूचना कळूच नयेत यासाठी हा आटापिटा होता की काय, अशी शंका उपस्थित झाली. विद्यार्थ्यांनी याबाबत शिक्षकवर्गाकडे तक्रारी केल्या असता सदर सूचना आणि प्रश्नपत्रिका बेंगळूर येथे तयार करण्यात आल्याचे उत्तर विद्यार्थ्यांना देण्यात आले.

मराठी विषयाच्या परीक्षेतील प्रश्न मराठी भाषेतून विचारण्यात आले होते. हे विद्यार्थ्यांचे सुदैव, मात्र पुढील प्रश्न किती गुणांसाठी आहे, याविषयी मात्र सर्व माहिती कन्नडमधूनच नमूद करण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संभ्रमाच्या मनस्थितीतच परीक्षा दिल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

Related posts: