|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » उद्योग » रिलायन्स इन्फ्राचा मुंबईतील व्यवसाय अदानीकडे

रिलायन्स इन्फ्राचा मुंबईतील व्यवसाय अदानीकडे 

1 हजार कोटी रुपयांना खरेदी

वृत्तसंस्था/ मुंबई

रिलायन्स इन्फ्राकडील मुंबईतील वीज वहन संपत्तीची खरेदी पूर्ण झाल्याचे अदानी ट्रान्समिशनकडून सांगण्यात आले. 3,063 किमी अंतरातील जाळे 1 हजार कोटी रुपयांना खरेदी करण्यात आला. यामुळे कंपनीचे पश्चिमेकडील जाळे मजबूत झाले आहे. कंपनीजवळ आता 8,500 सर्किट किमी लांबीचे नेटवर्क असल्याचे सांगण्यात आले.

अदानी ट्रान्समिशनकडे आता 28 सब स्टेशनसह 16,200 एमव्हीएपेक्षा अधिक ट्रान्सफॉर्मेशन क्षमता असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरमधील संपत्ती खरेदी करण्यासाठी 15 जानेवारी 2018 पर्यंत मुदत देण्यात आली होती. यामध्ये जनरेशन, ट्रान्समिशन, वितरण, मुंबईतील विद्युत सेवा यांचा समावेश करण्यात आला होता. मुंबईतील वीज व्यवसायाचे हस्तांतरण करण्यात आल्याने कंपनीचे कर्ज फेडण्यास मदत होईल असे रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने म्हटले. या व्यवहाराने मुंबईतील वीज क्षेत्रातील अदानी समुहाचे स्थान मजबूत होईल. यापूर्वी रिलायन्सने हा व्यवसाय कॅनेडियन कंपनीला विक्री करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र हा व्यवहार पूर्ण होऊ शकला नाही. जूनपर्यंत रिलायन्स इन्फ्राकडे 29 हजार कोटी रुपयांचे कर्ज होते. मार्च 2018 पर्यंत ते 10 हजार कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा प्रयत्न आहे.

कॅनेडियन कंपनीव्यतिरिक्त सिंगापूरच्या जीआयसी आणि अबु धाबी इन्व्हेस्टमेन्टने रिलायन्सकडील हा व्यवसाय खरेदी करण्यासाठी बोलणी केली होती.